15 / 100

You-have-to-choose-Heaven-or-hell12

Download PDF Tracts

तुम्हाला नरक किंवा स्वर्ग निवडायचा आहे 

तुम्ही काय निवडाल? तुमचा अनंतकाळ तुम्हाला कोठे घालवायचा आहे?

 

तुमचा निर्णय घेण्यापूर्वी, खाली दिलेल्या सत्यांचा विचार कराः

1.प्रत्येक व्यक्तीची मृत्युबरोबर आणि देवाबरोबर भेट नेमून दिलेली आहे. “आणि जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्यायासनासमोर येणे नेमून ठेवलेले असते” हिब्रु 9:27

2.प्रत्येक व्यक्ती एक पापी म्हणून जन्माला येते, पापामध्ये जन्म घेते, पहिला मानव, ऍडम, कडून मिळालेला वारसा, ज्याने देवाविरूद्ध पाप केले. मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला. साम 51:5

म्हणून पाप जसे एका मनुष्याद्वारे, जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, तसेच सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये मरण आले. रोमन्स 5:12

3. म्हणून मानव हा त्याच्या पापांमुळे सैतानाचा गुलाम आहे. जो प्रत्येक पाप करतो तो गुलाम आहे. पाप त्याचा मालक आहे. तुमचा पिता सैतान आहे. तुम्ही त्याचे आहात. त्याला करायला पाहीजे तेच तुम्ही करता. जॉन 8:34,44

4. कोणतीही व्यक्ती चांगली कामे, शपथा, वचने, वापरून किंवा मानवाने बनवलेले जगाचे तत्वज्ञान किंवा धर्म वापरून सुटका करून घेऊ शकत नाही. तो गुलाम आहे, आणि स्वतः स्वतःला मुक्त करू शकत नाही. कुणीही मानवी मित्र तुम्हाला वाचवू शकणार नाही आणि तुम्ही देवाला लाच देऊ शकत नाही. कारण त्यांच्या आत्म्याची मुक्तता बहुमोल आहे. साम 49:7,8

5.देवाचा अखेरचा न्याय असेल सर्व पाप्यांसाठी अग्नीच्या तळ्यामध्ये अनंतकाळासाठी शिक्षा कारण देव पवित्र आहे आणि त्याच्या उपस्थितीत कोणीही आणि काहीही अशुद्ध सहन केले जात नाही. कारण पापाची मजुरी मरण आहे. रोमन्स 6:23

जरी सर्व लोक पापी असले आणि सैतानाचे गुलाम असले, देवाकडे त्याच्या अतुलनीय प्रेमाने त्या सर्वांसाठी एक सुटका आहे जे विश्वास ठेवणे निवडतात आणि खालील मार्गाने विश्वास करतातः

1.   ओळखा कि तुम्ही एक पापी आहात आणि आपली पापे सोडून पश्चात्ताप करा आणि येशुकडे ती कबूल करा. म्हणून तुम्ही तुमची हृदये आणि जीवने बदलली पाहीजेत. देवाकडे परत या आणि तो तुमच्या पापांची क्षमा करील. ऍक्ट्स 3:19 “जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो.” I जॉन 1:9

2.   तुमच्या मुक्ततेसाठी येशु ख्रिस्ताचे नांव घेऊन गॉस्पेलमध्ये विश्वास करा. परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले कि तो आमच्यावर फार प्रेम करतो. रोमन्स 5:8

3. पाण्यामधून बाप्तिस्मा घ्या, कारण जरी तुमची सर्व पापे क्षमा केली गेली जेव्हा तुम्ही विश्वास केलात, तरीही पापाचा स्वभाव तो पुराणा मानव मेला पाहीजे आणि पुरला गेला पाहीजे म्हणजे तुम्ही पूर्णपणे एक नवीन जीवन जगू शकाल. म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो. रोमन्स 6:4

4.  त्यानंतर, तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा प्राप्त होईल (नव्या भाषेत बोलण्याच्या पुराव्यासोबत). जसे तुम्हाला सैतानाकडून पापांमध्ये त्याची चाकरी करण्यासाठी बळकट केले गेले, तसेच देव तुम्हाला पवित्र आत्म्याद्वारे सदाचरणाने आणि पवित्रतेने त्याची सेवा करण्यास बळ देईल. परंतु पवित्र आत्मा तुम्हांकडे येईल. मग तुम्हाला शक्ती मिळेल. तुम्ही माझे साक्षी व्हाल… ऍक्ट्स 1:8

निर्णय तुमचा आहे

नरकः मी माझ्या पापांमध्ये सैतानाची चाकरी करणे चालू ठेवणे निवडत आहे. मी देवाचे प्रेम आणि त्याने मला देऊ केलेली मुक्तता नाकारत आहे. मी त्यामुळे, ठरवले आहे कि, अनंतकाळासाठी सुटकेशिवाय नरकात राहायचे माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, अनंतकाळच्या अग्नीत जा. हा अग्नी सैतान आणि त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. मॅथ्यु 25:41

स्वर्गः मी सैतानाच्या गुलामगिरीतून आणि सैतानाकडून सुटका करून घेण्याचे निवडत आहे, देवाने देऊ केलेल्या मुक्ततेमध्ये विश्वास करून जी फक्त भगवान येशु ख्रिस्त देऊ शकतो. मला सदाचरण करून पवित्र देवाचे आज्ञापालन आणि त्याची सेवा करायची आहे. मी ठरवले आहे, देवाने दिलेल्या वचनाप्रमाणे, सर्व काळ त्या देवाबरोबर त्याच्या पवित्र शहरात राहायचे. चांगले काम केले, चांगल्या आणि इमानी दासा… आंत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो. मॅथ्यु 25:24

 

You can find equivalent English tract @

Heaven or hell