the clock is ticking

घड्याळ टिकटिक करत आहे!    वेळ निघून जात आहे!

 

देवाबरोबर तुमची गाठ पडणे जवळ येत आहे……….

बायबल म्हणतेः “तुझ्या परमेश्वराला भेटण्यास सज्ज हो!” आमोस 4:12

तुम्ही तयारी करत आहात का? तुम्ही सज्ज आहात का?

“तर आपण अशा महान तारणाकडे लक्ष दिले नाही, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू?” हिब्रू 2:3

आपले मृत्यु आणि देवाला भेटणे नेमून दिलेले आहे!

“आणि जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्यायासनासमोर येणे नेमून ठेवलेले असते.” हिब्रू 9:27

देवाला हवे आहे की तुम्ही तयारी करा!

मी काय केले पाहीजे?

1. ओळखा कि तुम्ही पापी आहात

“जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवत आहोत आणि आमच्यामध्ये सत्य नाही” I जॉन 1:8

“सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत” रोम 3:23

 2. ओळखा कि पापाची शिक्षा नरक आहे 

“जे लोक देवाला विसरतात ते वाईट असतात. ते लोक मृत्युलोकात जातील.” साम 9:17

3. ओळखा कि तुम्ही स्वतःला तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी वाचवू शकत नाही

“आमचा सर्व चांगुलपणा जुन्या मळलेल्या कपड्यांप्रमाणे आहे…..”इसाया 64:6

4. पश्चात्ताप करा आणि देवाची आज्ञा पाळा 

“भूतकाळात लोक देवाला समजू शकले नाहीत पण देवाने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता, जगातील प्रत्येक व्यक्तीला देव सांगतो की, त्याने आपले हृदय व जीवन बदलावे” ऍक्ट्स 17:30

5. येशू ख्रिस्तामध्ये उद्धारक म्हणून विश्वास करा

“देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे….” जॉन 3:16          

6. तुमची पापे येशूकडे कबूल करा 

“जर आम्ही आमची पापे कबूल करतो. तर आमच्या पापांपासून आम्हाला क्षमा करण्यास परमेश्वर विश्वासू व न्यायी आहे.” I जॉन 1:9

7. गॉस्पेलची शिकवण जगा 

“देवाची शिकवण काय सांगते त्याप्रमाणे नेहमी करा व फक्त ऐकूच नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.” जेम्स 1:22

अधिक माहीतीसाठी कृपया संपर्क करा : contact@sweethourofprayer.net

You can find equivalent English tract @

The clock is ticking