देव तुमच्यावर प्रीती करतो
तुम्हाला माहीत आहे का कि तुमच्यावर सर्वात जास्त प्रीती कोण करते? तो सर्वसमर्थ परमेश्वर, आपला निर्माणकर्ता आहे (रिव्हिलेशन 1:8, जेनेसिस 1:26,27, 2:7). देवाने तुमच्यावर एवढी प्रीती केली कि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, म्हणजे तुमच्या पापांची क्षमा होईल (ल्युक 23:34).
तुम्हाला माहीत आहे का देव तुमच्यावर एवढी प्रीती करतो? कारण तो प्रेमळ देव आहे ज्याने तुम्हाला त्याच्या प्रतिरूपात निर्माण केले. जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि अनंतकालिक जीवन गमावले तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाचा काय मोबदला देईल? (मॅथ्यु 16:26)
देव तुमच्यावर प्रीती करतो, परंतु तो पापांचा तिरस्कार करतो आणि त्यांचा न्याय करतो. पाप देवाच्या हृदयाला दुःख देते, ते तुम्हाला त्याच्यापासून वेगळे करते. न्यायदानाच्या दिवशी, ख्रिस्त पाप्यांना म्हणेल, “माझ्यापासून दूर हो, तुम्ही शापित आहात. अनंतकाळच्या अग्नीत जा. हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे….. पण नीतिमान अनंतकाळच्या जीवनासाठी जातील” (मॅथ्यु 25:41,46).
कारण पहिला मानव ऍडमने देवाची अवज्ञा केली, पाप, शाप, आजारपण आणि मृत्युने जगात प्रवेश केला, आम्ही सर्व पापी झालो, आणि नरकातील अनंतकाळच्या अग्नीत जाणे ठरून गेले. तरीही देवाने मानवजातीवर प्रीती केली, ज्यांना त्याने निर्माण केले, आणि ख्रिस्ताच्या मृत्युने त्यांना मुक्तता दिली आणि ऍडमने त्याच्या पापांमुळे आणि अवज्ञेमुळे हरवलेले सर्व आशीर्वाद पुन्हा प्राप्त करून दिले (रोमन्स 5:1 – 21, एफिसियन्स 1:3 -14).
तुमच्या जागी येशूने मरण पत्करले म्हणजे तुमचा धिक्कार केला जाऊ नये. कारण “पापाची मजुरी मरण आहे, परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे” (रोमन्स 6:23).
तुम्ही पाहू शकता देव तुमच्यावर कशी प्रीती करतो ते. त्याने फक्त त्याच्या दूतांनाच तुमचे तारण करण्यास धाडले नाही तर त्याने त्याचा एकुलता एक पुत्र जगाला दिला तुमची मुक्ती करण्यासाठी, कारण तो तुमच्यावर प्रीती करतो. येशू म्हणाला, “देवाने जगावर एवढी प्रीती केली कि त्याचा एकुलता एक पुत्र दिला, देवाने आपला पुत्र यासाठी दिला कि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे” जॉन 3:16). जरी, देव पवित्र आणि न्यायी आहे. तो तुम्हाला तेव्हाच स्वीकारेल जेव्हा फक्त तुम्ही पश्चात्ताप कराल आणि तुमच्या पापांसाठी ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताला स्वीकाराल (जॉन 3:3, रोमन्स3:24 -26). येशू म्हणाला, “पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा” (मार्क 1:15).
म्हणून, पश्चात्ताप करा आणि विश्वास ठेवा कि फक्त येशू ख्रिस्तच एकटा तुमच्या पापांसाठी मरण पावला आहे आणि त्याला तुमचा वैयक्तिक उद्धारक आणि देव म्हणून तुमच्या हृदयांत स्वीकारा. देव निश्चितच तुमची सर्व पापे येशूच्या रक्ताने धुऊन टाकेल आणि तुम्हाला निर्मळ बनवेल. पवित्र आत्मा तुमचे जीवन बदलेल आणि तुम्हाला एक नवीन हृदय देईल जेव्हा तुम्ही देवाचा शब्द ऐकाल आणि आज्ञापालन कराल. तो तुम्हाला शूचीभूर्त करेल आणि तुम्हाला त्याचे प्रेम, आनंद आणि शांतता, शहाणपण आणि शक्ती देईल आणि तुम्हाला त्याच्या राज्यात राहाण्यासाठी मार्गदर्शन करेल.
प्रिय मित्रा, सर्वसामर्थ्यवान देवाचा शब्द पाळ जो तुझ्यावर प्रीती करतो. पश्चात्ताप कर आणि आत्ता देवाकडे वळ. तुझ्याकडे फक्त एकच जीवन आहे, तु अचानक मरू शकतोस, तुला माहीत नाही कि केव्हा आणि कसे. पण देव त्याच्या दयेने, तुला संधी देत आहे अनंतकाळासाठी स्वतःला तयार करण्याची. देवाच्या क्षमेशिवाय, “जेथे तुझ्या आत्म्याला मरण येणार नाही आणि अग्नी विझत नाही अशा नरकात फेकले जाल” (मार्क 9:47.48) “जसे लोकांना एकदाच मरण आणि नंतर न्यायासनासमोर येणे नेमून दिलेले असते” (हिब्रु 9:27). “मी पुनरूत्थान आणि जीवन आहे. तो तुम्हाला कबरेतून उठवेल आणि तुमचा न्यायनिवाडा तुमच्या कृत्यांप्रमाणे करेल”(जॉन 11:25, जॉन 5:24 – 29). विचार करा आणि आत्ताच कृती करा. मृत्युच्या वेळी, तुम्हाला देवासमोर जायचे आहे, त्याच्या न्यायासमोर आणि अनंतकाळासमोर!
ओळखा कि तुम्ही पापी आहात. तुम्हाला मुक्त करणाऱ्याची गरज आहे, तो प्रभु येशू ख्रिस्त, जो तुम्हाला तुमच्या पापांपासून मुक्त करून देवाचा क्रोध आणि येणाऱ्या न्यायापासून वाचवेल. आत्ताच देवाला तुमची पापे क्षमा करण्यास सांगा प्रामाणिकपणे हृदयापासून ही त्याची प्रार्थना करा.
प्रार्थना
“प्रिय प्रभु, मला पाप्याला क्षमा कर, जो त्या मरणाला पात्र आहे जे येशूने वाहीले. मी माझ्या सर्व पापांसाठी अतिशय दुःखी आहे आणि आत्ता तुझ्याकडे वळत आहे. मी कबूल करतो आणि विश्वास करतो कि येशू ख्रिस्त, तुझा एकुलता एक पुत्र, ज्याने दुःख भोगले आणि क्रुसावर मरण पावला, त्याला पुरले गेले होते आणि तो पुन्हा मला मुक्त करण्यासाठी उठला आहे. कृपा करून मला येशूच्या रक्ताने शुद्ध कर आणि मला तुझे मुल बनव. मी येशूला माझ्या हृदयांत माझा वैयक्तिक उद्धारक आणि माझ्या जीवनाचा देव म्हणून येण्यास आमंत्रित करत आहे. या दिवसापासून तुझ्यासाठी जगण्यास मला मदत कर. माझ्या पित्या, येशूच्या नांवाने माझ्या आत्म्याला वाचविल्याबद्दल तुझे आभार असोत! आमेन.”
जिवंत देवाचे मूल असणे म्हणजे किती अहोभाग्य आहे! नेहेमी तुम्हाला वाचविल्याबद्दल येशूचे आभार माना.
You can find equivalent English tract @