16 / 100

free all inclusive insurance

Download PDF Tracts

मोफत सर्वसमावेशक इंशुरन्स पॉलीसी

 

आरोग्य

गृह

अग्नी

जीवन

इंशुरन्सबद्दल आनंदाची बातमी

आरोग्य

आज वैद्यकीय उपचाराची किंमत तब्बल वाढत जात आहे, तशीच आरोग्य विम्याची किंमतही वाढत आहे. तुम्ही कधीही अशा फिजीशियनला भेटला आहात का ‘जो तुमचे सर्व आजार बरे करण्याचा दावा करतो?’

“पण आमच्या दुष्कृत्यांमुळे त्याला दुःख भोगावे लागले: आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा त्याच्यावर लादली गेली. त्याने दुःख सहन केले म्हणून आम्ही बरे झालो.” इसाया 53:5

गृह

घरांचा विमा घेतला जातो कारण त्यांच्या मालकांचे प्रत्येक नुकसानापासून, चोरीपासून, अतिक्रमणापासून रक्षण व्हावे म्हणून. दरवाजे आणि खिडक्यांवर लोखंडी सळ्या, चोरीसाठी अलार्म आणि शेजारीपाजारी गस्त घालणे, घरमालकाला सुरक्षितता किंवा मनाची शांतता देत नाहीत.

तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, जागा नसत्या तर मी तुम्हांला सांगितले असते. कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो” जॉन 14:1,2.

अग्नी

अग्नी घरे आणि मौल्यवान मालमत्ता, ज्याची उणीव भरून काढू शकत नाही अशाही काही, नष्ट करतो. परंतु अनंतकाळामध्ये तेथे अग्नी आहे जो चिरंतन असेल. तुमच्याकडे त्या अग्नीपासून तुम्हाला सुरक्षित ठेवणारी पॉलीसी आहे का?

जो विजय मिळवितो, त्याला या सर्व गोष्टी मिळतील, मी त्याचा देव होईन, व तो माझा पुत्र होईल.

परंतु भित्रे, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खुनी, व्यभिचारी,(म्हणजे लैंगिक अनीतीने वागणारे लोक), चेटकी, मूर्तीपूजा करणारे आणि सर्व खोटे बोलणारे अशा सर्वांना अग्नीने व गंधकाने धगधगणाऱ्या तळ्यामध्ये जागा मिळेल, हे दुसरे मरण आहे. रिव्हिलेशन 21:7,8

जीवन

अनेकजण हजारो डॉलर्सच्या किंमतीचा जीवन विमा घेतात. पण फायदा कोणाला मिळतो? तुमच्यासाठी त्याचे काय मूल्य जेव्हा तुम्ही मेलेले असाल?

देवाने जगावर एवढी प्रीती केली कि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे.” जॉन 3:16

पॉलीसीच्या अटी

1. ओळखा कि तुम्ही पापी आहात

“सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत,” रोमन्स 3:23

“जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवीत आहोत. आणि आमच्यामध्ये सत्य नाही.” Iजॉन 1:8

2. ओळखा कि पापाची शिक्षा नरक आहे

“जे लोक देवाला विसरतात ते वाईट असतात. ते लोक मृत्युलोकात जातील.” साम 9:17

3. ओळखा कि तुम्ही स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःचे तारण करू शकत नाही

“आमचा सर्व चांगुलपणा जुन्या मळलेल्या कपड्यांप्रमाणे आहे….” इसाया 64:6

4.पश्चात्ताप करा आणि देवाची आज्ञा पाळा

“भूतकाळात लोक देवाला समजू शकले नाहीत पण देवाने त्याकडे दुर्लक्ष केले, पण आता, जगातील प्रत्येक व्यक्तीला देव सांगतो की, त्याने आपले हृदय व जीवन बदलावे.” ऍक्ट्स 17:30

5. येशू ख्रिस्तामध्ये उद्धारक म्हणून विश्वास करा

“देवाने जगावर एवढी प्रीती केली कि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे.” जॉन 3:16

6. तुमची पापे येशूकडे कबूल करा

“जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो.” Iजॉन 1:9

7. पाण्यातून आणि पवित्र आत्म्याद्वारे बाप्तिस्मा घ्या

“तुमची हृदये व जीविते बदला आणि येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही प्रत्येकाने बाप्तिस्मा घ्यावा. मग देव तुमच्या पापांची क्षमा करील आणि तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.” ऍक्ट्स 2:38

8. गॉस्पेलची शिकवण जगा

“फक्त ऐकूच नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.” जेम्स 1:22

 

कराराचे मुद्दे

हा करार अनंतकाळासाठी तयार केला आहे. कितीही पैसे किंवा चांगली कामे त्यासाठी देऊ शकत नाही. किंमत येशू ख्रिस्ताने दिली आहे जेव्हा तो क्रुसावर मरण पावला. प्रिमियम, सहखर्च आणि सहविमा येशू ख्रिस्ताने अगोदरच देऊन ठेवला आहे जेव्हा तो क्रुसावर मरण पावला. कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले नाही, तर ते देवापासूनचे दान असे आहे (एफिशियन्स 2:8) विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात राहावा (एफिशियन्स 3:17)

 

You can find equivalent English tract @

Free All inclusive Insurance Policy