येशू प्रेम करतो येशू मदत करतो
जे थकलेले आणि ओझ्याने लादलेले असे सर्व मजकडे(येशू) या आणि मी तुम्हाला विश्रांती देईन (मॅथ्यु 11:28).
देवाने जगावर एवढी प्रीती केली कि त्याने आपला एकुलता एक पुत्र(येशू) दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे (जॉन 3:16).
या गरीब माणसाने परमेश्वराकडे(येशू) मदत मागितली आणि परमेश्वराने माझे ऐकले. त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली (साम34:6).
देवाने(येशू) आज्ञा केली आणि त्यांना बरे केले. म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले. (साम 107:20).
आई जशी मुलाला आराम देते तसा मी तुम्हांला देईन (इसाया 66:13).
तू मला विसरू नकोस (इसाया 44:21). परमेश्वराचा अनुभव घ्या आणि तो(येशू) किती चांगला आहे ते शिका (साम34:8).
येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे (हिब्रु 13:8).
“मी (येशू) मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते” (जॉन 14:6)
कारण मनुष्याचा पुत्र(येशू) जे हरवलेले ते शोधावयास व तारावयास आला आहे (ल्यूक19:10).
काही लोकांनी त्याला(येशू) आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला (जॉन 1:12).
शब्द(ख्रिस्त) हा कृपा(दयाळूपणा) व सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. त्याच्याकडून आम्हांला भरपूर आशीर्वाद मिळाले (जॉन 1:16).
पण आमच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला दुःख भोगावे लागले. आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा, त्याच्यावर लादली गेली. त्याने दुःख सहन केले म्हणून आम्ही बरे झालो (इसाया 53:5).
“मी चांगला मेंढपाळ आहे: चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी स्वतःचा जीव देतो” (जॉन 10:11).
पश्चात्ताप करा: कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे (मॅथ्यु 4:17).
प्रभु येशूवर विश्वास ठेव आणि तुझे तारण होईल, तुझे व तुझ्या घरात राहणाऱ्या सर्वांचे तारण होईल (ऍक्ट्स 16:31).
त्यातील प्रत्येकजण माझ्याकडे(येशू) येईल आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मी स्वीकारीन (जॉन 6:37).
परमेश्वर म्हणतो, जर एखादा माणूस माझ्यावर(येशू) विश्वास ठेवेल; तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो (साम 91:14)
मी(येशू) गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन. आणि तुम्हांला माझ्याजवळ घेईन. यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे (जॉन 14:3).
कारण पापाची मजुरी मरण आहे. परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे (रोमन्स 6:23).
आम्ही जेव्हा आमचे स्वतःचे तारण करण्यासाठी अशक्त होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी आमच्यासाठी मरण पावला (रोमन्स 5:6).
प्रभु येशू ख्रिस्त या जगात 2000 वर्षांपूर्वी आला. त्याने सर्व लोकांचे भले केले आणि सर्व तऱ्हेचे आजार बरे केले. त्याने देवाच्या राज्याचे वर्णन करणारी गॉस्पेलची शिकवण दिली. तो मेलेल्यांतून उठला आणि आजही जिवंत आहे. तो काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे. त्याच्याकडे जे येतात त्या सर्वांचे तो आजही भले करतो.
प्रार्थनाः
“येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो, माझी पापे क्षमा कर, आणि माझे आजार बरे कर. मला शांतता, विश्रांती आणि आनंद दे. मला अनंतकाळचे जीवन दे आणि आशीर्वाद दे. आमेन.”
You can find equivalent English tract @