मरण्यासाठी जगणे? नाही, अनंतकाळ जगणे
शास्त्र अनेक दिशांमध्ये विकसित झाले आहे, अगदी अंतराळात संशोधनही होत आहे परंतु मरण हा विषय मोठ्या प्रमाणात असंशोधित राहीला आहे. काही थोडे डॉक्टर्स, शास्त्रज्ञ आणि तत्ववेत्ते आहेत ज्यांनी मरण हा विषय, मरण या घटनेला समजून घेणे आणि मरणानंतर काय होते त्याचा अभ्यास केला आहे. शास्त्रज्ञ मानव शरीराबद्दल आणि या ग्रहावरील त्याच्या छोट्याशा अस्तित्वाबद्दल, ऍटम्सबद्दल आणि नैसर्गिक परिवर्तनाबद्दल जगाला सतत विशद करत असतात परंतु या भयंकर शेवटाबद्दल ज्याला मरण असे म्हटले जाते जे प्रत्येक मनुष्याला येते त्याबद्दल फार थोडे शिकवले जाते. थोड्या जणांकडे मरणाबद्दल अभ्यास करण्याची इच्छा किंवा क्षमता दिसून येते, आणि तरीही ते प्रत्येकाला गिळून टाकते आणि शास्त्रज्ञ आणि पंडीतांनांही न टाळता येण्याजोग्या प्रतिक्षेत एकसमान असते. वेदना, अश्रु, आजार, जखमा, भीती, दुःख, भंगलेले हृदय, निराशा आणि इच्छा, आम्ही अनुभवतो जोपर्यंत अखेरशेवटी मरणाकडून गिळले जात नाही, जिवंत लोकांच्या जगात कधीही परत न येण्यासाठी. ज्या क्षणी मनुष्य उदरातून सूर्यप्रकाशाला वंदन करण्यासाठी बाहेर येतो, तेव्हाच तो मरणाशी एक करार करतो. तेथे आवडणे किंवा नावडणे काहीही असू शकत नाही. बायबल म्हणते, “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत”. “कारण पापाची मजुरी मृत्यु आहे” (रोम.3:23, 6:23). “जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्यायासनासमोर येणे नेमून ठेवलेले असते” (हिब्रु 9:27). आमच्यापैकी प्रत्येकाला निश्चित मरण येणार आहे; आणि जर आम्ही या आयुष्यात देवापासून वेगळे झालो, तर आम्ही त्याच्यापासून अनंतकाळासाठी वेगळे होऊ. आम्ही जीवनाच्या देणगीपासून जसे प्रेम, आनंद, सौंदर्य, सत्य, शांतता आणि समाधानाला नेहमीकरता वंचित होऊ आणि अनंतकाळासाठी मरणयातनांच्या वेदना, अंधःकार, एकटेपणा, शरम आणि पश्चात्ताप सहन करत राहू.
फक्त एका व्यक्तीने आमचा उद्धारक येशू ख्रिस्ताने मृत्युचे रहस्य भेदले आहे आणि मानवजातीला जीवनाचा आणि अमरत्वाचा “नवीन आणि जिवंत मार्ग” प्रकट केला आहे. आमचा उद्धारक ख्रिस्त येशू, “ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अमरत्व व जीवन प्रकाशाला आणले” (II टिम. 1:10). इतिहास त्याच्याभोवती आणि त्याच्या जन्माभोवती फिरतो जसे जगाचा इतिहास ख्रिस्तपूर्व आणि ख्रिस्तजन्मानंतर मध्ये विभागला गेला आहे. आणि जीवन आणि मृत्यु त्याच्याभोवती फिरते जसे तो आमच्या पापांसाठी मरण पावला, पुरला गेला, आणि पाप, मृत्यु, नरक आणि कबरेवरील देवाच्या शक्तीच्या विजयाने त्याला पुन्हा जिवंत केले गेले. अनेक पटीतील शिष्यांनी त्याचे पुनरूत्थान पाहीले आणि जगातील लाखो लोक आज साक्ष देतात कि तो खरोखर जिवंत आहे. “मी मेलो होतो, पण पाहा; मी अनंतकाळासाठी जिवंत आहे आणि, माझ्याजवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत” (रिव्हिलेशन 1:18).
येशू क्रुसावर मरणाला सामोरे जातानाही नम्र होता. त्याला प्रत्येक मनुष्यासाठी मरण भोगावे लागणार होते. येशूने हे यासाठी केले की “ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय मनात ठेवून त्याचे गुलाम असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे” (हिब्रु 2;9,14,15).
पृथ्वीवरील त्याच्या जीवनकाळामध्ये, येशू ख्रिस्ताने जीवन, मरण आणि अमरत्वाबद्दल उत्कटतेने शिकविले. त्याने असाध्य रोग्यांना बरे करून, मेलेल्यांना जीवंत करून, आंधळ्यांना दृष्टी देऊन, बहिऱ्यांना श्रवणशक्ती देऊन, आणि लुळ्यापांगळ्यांना चालण्याची शक्ती देऊन प्रकट केले कि, तो स्वतः पुनरूत्थान आणि जीवन आहे. त्याने देवामध्ये निर्विवाद विश्वास असलेल्या जीवनाची शिकवण दिली आणि ज्यांनी त्याची मदत मागितली त्यांच्या ऐहीक गरजा चमत्कृतीपणे पूर्ण केल्या. पूर्णतया खात्रीने त्याने मरणानंतरच्या जीवनाबद्दल शिकविले. त्याने स्वेच्छेने आमची पापे वाहीली आणि क्रुसावर आमच्यासाठी शिक्षा भोगली. नंतर येशू विजयीपणे उठला कारण आम्ही त्याच्यावर विश्वास करावा म्हणून आणि हे जाणावे कि तोच एक मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तो मार्ग – येशू हा जगण्याचा मार्ग आहे जो तुम्हाला देवाकडे त्या पित्याकडे घेऊन जातो तुम्हाला प्रत्येक परीक्षेत विजयी बनवतो, म्हणजे तुम्ही सुद्धा मृत्युला न भिता आणि अनंतकाळच्या जीवनाच्या खात्रीने सामोरे जाल.
सत्य – येशू हे सत्य आहे जे तुमचा आत्मा जाणून घेण्याची इच्छा करत आहे, तो एक जो तुम्हाला पाप आणि भिती पासून मुक्त करेल.
जीवन – येशू हे अनंतकाळचे जीवन आहे ज्याचा वैद्यकीय मृत्यु शेवट करू शकत नाही, जीवन जे अविनाशी, अमर्त्य शरीराने लपेटले जाईल.
लवकरच मृत्युचा निष्ठूर दूत तुमच्या आत्म्याची मागणी करेल, अपघाताने, रोगाने किंवा वृद्धापकाळाने. यापूर्वी कि तुम्ही चिरस्थायी मरणामध्ये हरवून जाल, तुम्हाला असलेल्या येशूच्या महान गरजेचा विचार करा. तो म्हणाला, “मी पुनरूत्थान आणि जीवन आहे: जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल” (जॉन 11:25). प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, तुमच्या पापांचे प्रायश्चित्त करा, आणि त्याला तुमचा उद्धारक म्हणून स्वीकारा. मृत्युची तुमच्यावर काही सत्ता चालणार नाही कारण देव तुम्हाला पवित्र आत्म्याने भरून टाकेल ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले. या, ऐका आणि शिका. सत्य तुम्हाला पापापासून आणि मृत्युपासून मुक्त करेल. येशू ख्रिस्त, जो पुनरूत्थान आणि जीवन आहे तुम्हाला येथे येण्यास आमंत्रित करत आहे.
प्रार्थनाः “प्रिय प्रभु येशू, मी जाणले आहे कि येथे फक्त एकच आयुष्य आहे आणि ते लवकरच समाप्त होईल. मी ओळखले आहे कि मी पापी आहे. माझी सर्व मालमत्ता, माझे सर्व मित्र मला वाचवू शकत नाहीत. मी तुझ्याकडे भंगलेल्या आणि पश्चात्तापदग्ध हृदयाने आलो आहे. मी माझ्या सर्व पापांचे प्रायश्चित्त करत आहे. कृपा करून मला क्षमा करा आणि मला शुद्ध कर. तुझ्या भेटीसाठी मला तयार कर. आमेन.”
You can find equivalent English tract @