11 / 100

Is-your-name-registeredMarathi2

Download PDF Tracts

तुमचे नांव नोंदले गेले आहे का?

जेव्हा तुम्ही या जगात जन्म घेतला, तुमच्या पालकांनी तुमच्या जन्माची नोंदणी जन्ममृत्यु नोंदणी कार्यालयात केली. नंतर पुढे, तुमचे नांव जगातील अनेक विविध ठिकाणी नोंदले गेले, जसे उदाहरणार्थ,

  • जेव्हा तुम्हाला शाळेत दाखल केले गेले
  •  जेव्हा तुमची कामासाठी नोंदणी झाली
  •  जेव्हा तुम्ही जमीन आणि घरे खरेदी करता
  • जेव्हा तुम्ही तुमच्या वाहनांचा विमा घेता
  • जेव्हा तुम्ही बँकेत खाते उघडता
  • जेव्हा तुम्ही रेशन कार्ड मिळवता
  • जेव्हा तुम्ही मतदार ओळखपत्र मिळवता
  • जेव्हा तुम्ही तुमच्या घरासाठी वीजेचे कनेक्शन घेता

जर तुमचे नांव इतक्या सर्व ठिकाणी या नाशवंत जगात जगण्यासाठी नोंदले गेले आहे, तर स्वर्गाबद्दल काय? तुमचे नांव स्वर्गामध्ये आत्ताच नोंदले जाणे आवश्यक नाही का, जर तुमच्या मृत्युनंतर, तुम्हाला तेथे आनंद आणि शांततेत अविनाशी अनंतकाळासाठी राहायचे आहे? होय, तुमचे नांव नक्कीच आत्ताच तेथे नोंदले गेले पाहीजे.

तुमचे नांव तेथे नोंदले जाण्यासाठी तुम्ही काय केले पाहीजे? तुमचे नांव तेथे नोंदले जाण्यासाठी, तुम्ही देवाच्या स्वर्गीय कुटुंबाचे सदस्य म्हणून जन्माला आले पाहीजे. या बद्दल आम्ही पवित्र बायबलमध्ये वाचतो, “काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला” (जॉन 1:12). जर तुम्ही प्रभु येशूवर तुमच्या हृदयापासून विश्वास ठेवला आणि त्याला तुमचा स्वतःचा देव आणि उद्धारक म्हणून स्वीकारले, तुम्ही त्याचे मूल व्हाल. तो तोच होता ज्याने क्रुसावर सैनिकांकडून शिक्षा घेतली जी तुम्हाला तुमच्या पापांसाठी व्हायला हवी होती, आणि तुमच्यासाठी तो मरण पावला. तो फक्त मरण नाही पावला पण तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत केला गेला आणि तेव्हापासून सर्वकाळ जिवंत आहे. जर तुमची पापे एकामागून एक कबूल कराल जी तुम्ही तुमच्या लहानपणापासून केली आहेत, तो तुमची पापे क्षमा करेल आणि त्याचे मुल म्हणून तुमचा स्विकार करेल. तु तुमचे हृदय त्याचा आनंद आणि शांततेने भरून टाकेल. या प्रकारे ज्यांना त्याची मुले बनवले गेले, तो म्हणाला, जेव्हा तो या जगात होता, “तुमची नांवे स्वर्गात लिहीली आहेत याचा आनंद माना” (ल्यूक 10:20). प्रभु य़ेशूवर विश्वास ठेवून जे त्यांच्या पापाची क्षमा प्राप्त करतात त्यांची नांवे स्वर्गात नोंदली जातात. पुढे, जसे बायबल म्हणते, “जो देवाचा पुत्र झाला आहे तो कोणीही पाप करीत नाही” (Iजॉन 3:9), प्रभु येशू अशा लोकांवर या पापी जगात कोणतेही पाप न करता पवित्र जीवन जगण्यास कृपा करतो. पुढे, जेव्हा प्रभु येशू क्रुसावर मरण पावला, त्याने फक्त तुमची पापेच वाहीली नाहीत तर तुमचे आजारही वाहीले. म्हणून जे त्याच्यावर विश्वास करतात त्यांना असाध्य आजारांपासूनही मुक्ती मिळते आणि निरोगी जीवन जगतात.

 

असे असल्यामुळे, त्या नांवांचा काय शेवट होतो ज्यांची नांवे स्वर्गात नोंदली गेलेली नाहीत? मृत्युनंतर, न्याय होईल त्या दिवशी त्यांच्याबरोबर ज्या गोष्टी होतील त्याची चिंता करून, लिहीले गेले आहे, “आणि जर कोणाचे नांव जीवनी पुस्तकात सापडले नाही, तर त्याला अग्नीच्या तळ्यात टाकण्यात येत होते” (रिव्हिलेशन 20:15).

येशूचे रक्त तुम्हाला क्षमा देते – तुमची पापे नष्ट करते. त्याचा क्रुस तुम्हाला आशीर्वाद देतो – तुमचा शाप नष्ट करतो. त्याच्या जखमा तुम्हाला तुमच्या आजारातून बरे करतात. त्याचे मरण तुम्हाला धाडस देते – तुमची मृत्युबद्दलची भीती नाहीशी करते. प्रभु येशूच्या जीवनातून तुम्हाला अनंतकाळचे जीवनही मिळते. तुमचे नांव या पृथ्वीवर नाही, तर जीवनाच्या त्या पुस्तकात लिहीले जाईल जे स्वर्गात आहे. आजच प्रभु येशूकडे या म्हणजे तुम्हाला ती खरी शांतता आणि आनंद मिळेल जो हे जग देऊ शकत नाही, आणि तुमच्या मृत्युनंतर स्वर्गात प्रवेश करण्याची सवलतसुद्धा मिळेल. प्रभु येशूवर विश्वास करून खाली दिलेली प्रार्थना म्हणाः

 

“प्रभु येशू, मी तुझ्यामध्ये विश्वास करतो आणि माझे पूर्ण जीवन तुला वाहत आहे. मला शुद्ध कर आणि तुझ्या पवित्र रक्ताने माझ्या सर्व पापांपासून मला शुचीभूर्त कर. मला तुझे मुल म्हणून स्विकार आणि माझे नांव स्वर्गात आत्ताच नोंदणी कर. यापुढे, माझ्या सर्व दिवशी मी तुझे मूल म्हणून जगेन. आमेन.”

 

You can find equivalent English tract @

Is your name registered ?