12 / 100

how-to-be-really-happy2

Download PDF Tracts

खराखुरा आनंद कसा प्राप्त करायचा

 

ही पत्रिका तोपर्यंत फेकू नका जोपर्यंत तुम्ही ही पूर्णपणे वाचत नाही. येशू तुमचे जीवन बदलू शकतो आणि तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांपासून समाधान देऊ शकतो.

हे खरे आहे कि, तुम्ही शांतता आणि आनंद शोधत असाल, तरीही तुम्हाला तो मिळाला नसेल. लाखोजण धूम्रपान करून, मद्य पीऊन, नृत्य करून, जुगार खेळून, ड्रग्ज घेऊन आणि शारीरिक व्यभीचार करून शांतता आणि आनंद मिळवण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतात. आनंद मिळण्याऐवजी, ते स्वतःला मानसिक औदासिन्य आणि आजाराच्या यातनांमध्ये शेवटी अडकलेले पाहातात. काहीजण निराशेमध्ये त्यांचा स्वतःचा जीवही घेतात.

प्रिय मित्रा, आनंदाचे रहस्य अगदी साधे आहे. अनेक वर्षांपूर्वी, मी माझ्या पापी आयुष्यामुळे एक मानसिक रोगी होतो. मी अनेक धर्माद्वारे ख्रिश्चन धर्माच्या समावेशासह आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पण तो मिळाला नाही. मी अनेक आदरणीय आणि धार्मिक लोकांकडे गेलो. मी जगातील अनेक महान लोकांनी लिहीलेली सदाचारपूर्ण आणि नैतीक पुस्तके वाचली. निष्कर्ष गोंधळात टाकणारा आणि भ्रमनिरास करणारा होता. कधीकधी तर, मला जगण्याचे कारणही मिळत नव्हते.

एके दिवशी माझे पूर्ण जीवन नाट्यमयरित्या बदलले. तो दिवस होता ज्या दिवशी येशू ख्रिस्त अवतीर्ण झाला आणि त्याने मला सांगितले कि माझ्या सर्व पापांसाठी आणि आजारांसाठी तो मरण पावला आणि जर मी त्याच्यावर विश्वास करेन, आणि माझी पापे त्याच्याकडे कबूल करेन, तर तो मला क्षमा करेल आणि माझे घृणास्पद, ओंगळ आयुष्य बदलेल. मी माझ्या हृदयाच्या तळापासून येशूकडे रडलो. ज्या क्षणी मी माझ्या सर्व पापांची क्षमा मागितली, ते पवित्र रक्त जे त्याने सैनिकांच्या क्रुसावर सांडले होते त्याने मला शुद्ध केले. मला प्रचंड आराम वाटला. जसे काही हजारो हिमालय पर्वतांनी मला दाबून ठेवले होते ते अदृश्य झाले. एक सुखदायी भावनाः “शांतता जी समजण्यापलीकडली आहे” जी कोणतेही मानवी वर्णन करू शकणार नाही, माझ्या पूर्ण अस्तित्वातून वाहत गेली. जसा स्वर्गीय आनंद माझ्या हृदयात भरून आला, मी ख्रिस्ताला माझ्या हृदयांत येताना आणि राजांचा राजा आणि देवांचा देव म्हणून स्थापना झाल्याचे अनुभवले. तेव्हापासून, माझ्या आयुष्याला नवीन अर्थ मिळाला. त्याने मला भयंकर आजारातूनही बरे केले जसे, डायबेटिस, दमा, मूळव्याध, टायफॉइड आणि कावीळ. आता प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे, मी एक आनंदी आणि निरोगी माणूस आहे.

तुम्ही हे सर्व आणि कितीतरी अनेक रोमांचक अनुभवांचा आनंद घेऊ शकता, जर तुम्ही आत्ताच, येशू ख्रिस्ताला तुमचा देव आणि उद्धारक म्हणून स्विकारले आणि तुमची सर्व पापे त्याच्याकडे कबूल केली तर. “जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हाला क्षमा करण्यास देव विश्वासू आणि न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतींपासून तो आम्हाला शुद्ध करतो.” येशू ख्रिस्ताचे रक्त…. आम्हाला आमच्या सर्व पापांपासून शुद्ध करते. आणखी जर तुम्हाला कोणते आजार असतील, मानसिक किंवा शारीरीक, तो तुम्हाला बरे करू शकतो आणि तुम्हाला आनंद आणि आरोग्य देऊ शकतो. “आमच्या दुष्कृत्यांमुळे त्याला दुःख भोगावे लागले, आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा त्याच्यावर लादली गेली. त्याने दुःख सहन केले म्हणून आम्ही बरे झालो” (इसाया 53:5). “(येशू) त्याने त्या सर्वांना बरे केले जे आजारी होते.”

आत्ताच, कृपा करून प्रार्थना कराः “प्रभु येशू, मी विश्वास करतो कि तू माझा देव आणि उद्धारक आहेस. तू माझ्या सर्व पापांसाठी आणि आजारांसाठी मृत्यु पत्करलास. मला क्षमा कर आणि माझी सर्व पापे तुझ्या पवित्र रक्ताने धुऊन टाक. माझ्या हृदयात ये. माझे तारण कर आणि मला आत्ताच बरे कर. येशूच्या नांवाने. आमेन:”

“जो प्रभु (येशू)वर विश्वास करतो तो आनंदी होईल.”

 

You can find equivalent English tract @

How to be really happy