13 / 100

where-will-you-spend-your-eternity (1)2

Download PDF Tracts

तुम्ही तुमचा अनंतकाळ कोठे घालवाल?

एका प्रोफेसरची एक गोष्ट आहे जो शेताच्या भागात फिरायला गेला आणि त्याचा रस्ता हरवला. तो एका आडव्या छेदून जाणाऱ्या रस्त्याकडे आला, जेथे त्याला एक लहान मुलगा त्याच्या कुत्र्याबरोबर चालत असताना दिसला. “मुला, हा रस्ता कोठे जातो?” त्याने विचारले. “मला माहीत नाही.” “हा रस्ता कोठे जातो?” “मला माहीत नाही” “आणि तो रस्ता?” “मला माहीत नाही.” “आणि तो?” “मला माहीत नाही.” “मूर्ख मुला, तुला काहीही माहीत नाही!” तो माणूस उद्गारला. “बरे आहे,” तो मुलगा म्हणाला, “एक गोष्ट मला माहीत आहे. मी तुझ्यासारखा हरवलेला नाही आहे!”

मित्रा, तुझ्यासमोर अनंतकाळ ठेवलेला आहे. तू अनंत जीवन किंवा अनंत अधोगती एक किंवा दुसरीकडे चालला आहेस. “अशी वेळ येत आहे की, सर्व लोक जे मेलेले आहेत व आपल्या कबरेत आहेत ते त्याची(येशुची) वाणी ऐकतील, मग ते आपल्या कबरेतून बाहेर येतील; ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात चांगली कामे केली ते उठतील आणि त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल, परंतु ज्या लोकांनी वाईट कामे केली ते शिक्षा भोगण्यासाठी उठतील,” असे बायबल म्हणते(जॉन 5:28,29). तुम्हाला माहीत आहे का कि तुम्ही कोठे जात आहात? तुम्हाला माहीत आहे का कि तुम्ही तुमचा अनंतकाळ कोठे घालवणार आहात? त्या प्रोफेसरप्रमाणे, तुम्हाला या जीवनात अनेक गोष्टी माहीत असतील, या जीवनात अनेक गोष्टींबद्दल तुम्हाला माहीत असेल; परंतु तरीही, तुम्हाला माहीत नसू शकते कि मृत्युनंतरच्या आयुष्यासाठी तुम्ही कोठे चालला आहात.

आपण मृत्युपश्चात-आयुष्य टाळू शकत नाही, परंतु आपण ती जागा निवडू शकतो जेथे आपण जाणार आहोत. देव म्हणतो, “मी तुम्हाला जीवन आणि मृत्यु या दोहोतून एकाची निवड करायला सांगत आहे…..तेव्हा जीवनाची निवड करा (ड्युटरोनॉमी 30:19).

आता, येथे दिले आहे तुम्हाला तुमचे स्थान कशा प्रकारे सापडेल ते, आणि तुमची दिशा जर तुम्हाला तुमचे लक्ष्य बदलायचे असेल तर.

कबरीच्या पलीकडे विश्वातील दोन मुख्य स्थाने आहेत स्वर्ग म्हणजे देवाचे राज्य. ही प्रकाशाची आणि सौंदर्याची भूमी आहे, परिपूर्ण शांतता आणि आनंद. हे देवाच्या सान्निध्यात जगायचे आणि त्या सर्व आनंदांचा उपभोग घ्यायचा जो त्याच्याकडे आपल्यासाठी आहे. सामान्य मनुष्याला या सर्वाबद्दल माहीत होऊ शकत नाही, कारण, बायबल म्हणते, “डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, आणि मनुष्याच्या अंतःकरणाने जे उपजविले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे” (1 कॉरिंथियन्स 2:9). मग देवाच्या राज्याची रहस्ये कोण जाणू शकते? “आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभु….तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धीमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या,” देवाचा शब्द सांगतो(मॅथ्यु 11:25). आणि ही ती “बालके” आहेत जी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकतात. म्हणून प्रिय मित्रा, जर तु तुझ्या उच्च आणि प्रबळ स्वभावामधून खाली आलास आणि नम्रपणे भगवान येशुकडे वळलास, तर दिसून येईल कि तुझ्यासाठी किती महान गोष्टी अनंतकाळात राखून ठेवल्या गेल्या आहेत, देव तुला त्या जागी जाण्याचा मार्गसुद्धा दाखवेल.

अनंतकाळातील दुसरी जागा आहे नरक. ही अंधारमय आणि दुःखाची जागा आहे जेथे जे भगवान येशुला नाकारतात त्यांना अखंडपणे आणि सतत यातना दिल्या जातील. ही जागा सैतानासाठी आणि त्याच्या दूतांसाठी त्यांच्या स्वतःच्या स्वभावाने तयार केली गेली होती, त्यांचा वाईटपणा आहे जो “अनंतकाळचा अग्नी” (मॅथ्यु 25:41) तयार करतो. मनुष्य सुद्धा तेथे सैतानाबरोबर पोहोचतो, जेव्हा तो सैतानामागे जाण्याचे निवडतो, जेव्हा तो त्याच्यामागे चालतो “पृथ्वीचा जो राजकुमार आहे त्याच्याप्रमाणे…शरीर आणि मनाच्या वासना पुरवित राहातात” (एफीशियन्स 2:2,3). “दुष्ट माणसाची पापे त्याला जाळ्यात पकडतील. त्याची पापे दोरीप्रमाणे त्याला पकडतील” (प्रॉव्हर्ब्स 5:22). नरक हा “मृत्यु” म्हणूनही ओळखला जातो. (रिव्हिलेशन 21:8) ती “मजूरी” आहे जी पाप तुम्हाला देते (रोमन्स 6:23). दैहीक विचारांचे असणे म्हणजे “मरण” (रोमन्स 8:6), पापांच्या आनंदात जगणे म्हणजे “मृत्यु” (I टिमोथी 5:6) तुम्ही थोडे थोडे करून मृत्युकडून गिळले जात आहात!

भगवान येशु खाली आला आणि त्याचे रक्त त्याने आमच्यासाठी सांडले म्हणजे ते जे त्याच्यावर विश्वास करतात आणि त्याला स्विकारतात ते ह्या अनंत क्लेशाच्या जागेतून सुटका करून घेऊ शकतील, आणि त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल. “मी मार्ग, सत्य, आणि जीवन आहे” (जॉन 14:6). “जो कोणी पुत्रावर(येशु) विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळते : परंतु जो पुत्राची आज्ञा पाळीत नाही त्याला अनंतकाळचे जीवन कधीही मिळणार नाही; उलट देवाचा क्रोध त्याच्यावर राहातो” (जॉन 3:36).

प्रिय वाचका, तुझ्या प्रवासात थांब. स्वतःला विचारः “मी कोठे जात आहे? मृत्युनंतर मी कोणत्या जागी पोहोचेन?” आज नक्की करा कि तुम्ही योग्य दिशेने प्रवास करत आहात.

प्रार्थनाः प्रिय देवा येशु, मी तुला माझा देव आणि उद्धारक म्हणून स्विकारत आहे. दया करून माझ्या हृदयांत ये. माझी सर्व पापे धुवून टाक आणि मला स्वर्गाच्या पात्रतेचे बनव (अनंतकाळचे जीवन). आमेन.

एक खास सूचनाः देवाच्या राज्यात गौरव आणि सौंदर्यामध्ये विविधता असलेले अनेक प्रदेश आहेत.

 

You can find equivalent English tract @

Where will you spend your eternity ?