17 / 100

The real God page-1The-real-God-page-22

Download PDF Tracts

खरा देव

जीवन माझ्यासाठी फार काही होते. माझी पत्नी, दोन मुले, आणि मला वाटत होते पुढे जाण्यासाठी आमच्याकडे खूप काही आहे जोपर्यंत डॉक्टरनी मला सांगितले कि माझ्या श्वासनलिकेत वाढत असलेल्या ट्युमरमुळे माझ्याकडे आयुष्य जगण्यासाठी फक्त थोडा काळ आहे. माझे आयुष्य वाढविण्याचा एकच संभवनीय मार्ग होता, तो ट्युमर काढून टाकण्यासाठी ऑपरेशन्सच्या साखळीमधून जाणे, त्याबरोबर माझा व्हॉइस बॉक्सही काढणे. अशा संकटाने माझ्या आयुष्याला अचानक गंभीररीत्या थांबवले.

अनेक बायोप्सीनंतर, मी पहिल्या ऑपरेशनसाठी गेलो. त्यासाठी फक्त एक तास लागणार होता, पण ते पूर्ण दिवस चालले. त्या अनुभवाच्या यातना असह्य होत्या. जागे झाल्यावर, मला आढळले कि माझा घसा कापून उघडलेला आहे, आणि एक ट्रॅचिअल ट्युब आत घातलेली आहे. मी फक्त माझा अंगठा या ट्युबच्या छिद्रावर ठेवून बोलू शकत होतो.

एका संध्याकाळी ऑपरेशननंतर सुमारे दहा दिवसांनी (जे यशस्वी झाल्याचे सांगितले गेले होते), अचानक माझ्या तोंडातून रक्त वाहू लागले. मी ताबडतोब नर्सला बोलावले. लवकरच तेथे अनेक डॉक्टर ही रक्ताची ओकारी थांबवण्याचा प्रयत्न घाईघाईने करू लागले जी तीन तासांहून जास्त वेळ चालू राहीली. ‘आम्ही सर्व प्रयत्न केले आहेत!’ एका डॉक्टरने त्याच्या तणावाने निराश होऊन घोषणा केली. मृत्युची जवळीक ओळखून, मी असहायपणे ओरडलो, ‘देवा येशु, मला मदत कर!’ त्या क्षणीच रक्त वाहणे थांबले.

ते काहीतरी येशुच्या नांवाबद्दलच होते असणार! असे का? ठिक तर, मला स्पष्ट करू द्या पहिल्या ऑपरेशनच्या नुकतेच आधी काय घडले ते.

या ऑपरेशनची वाट पहात असताना मला एका प्रचंड भीतीने ग्रासले, आणि मी माझ्या चर्चमध्ये सांत्वना शोधण्याचे ठरवले. माझे सर्व आयुष्य मी या प्रभावाखाली होतो कि देव कोठेतरी फार दूर आहे, आणि मेरी, येशुची आई, देव आणि मनुष्यामधील मध्यस्थ आहे. माझा एक आवडता ‘संत’सुद्धा होता ज्याची मी संकटप्रसंगी प्रार्थना करत असे. म्हणून त्या रविवारी मी माझ्या सर्व ताकदीनिशी प्रार्थना केली, पण माझी निराशा झाली, मी त्या चर्चमधून तसाच बाहेर पडलो जसा तेथे प्रवेश केला होता.

घरी परतत असताना, माझ्या हृदयात प्रचंड विषाद दाटून आला, या भीतीपासून स्वतःची सुटका करून घेण्याचा काही मार्गच दिसत नव्हता. माझे लक्ष अचानक एका घराच्या खिडकीतून येणाऱ्या काही गॉस्पेलच्या संगीताकडे गेले आणि मला आत जाण्याची ओढ लागली. एकदा आत गेल्यावर, मला सुमारे सहा माणसांचा एक गट एक भजन गाताना आढळला. जेव्हा ती सभा संपली, पाद्र्याने माझे स्वागत केले आणि विचारले, ‘मी आपल्यासाठी काय करू शकतो?’ मी त्याला होणाऱ्या ऑपरेशनबद्दलची गंभीरता सांगितली आणि त्याला प्रार्थना करण्यासाठी विनंती केली. त्याने प्रार्थना केली, आणि नंतर, मला इतके आश्चर्य वाटले, ती सर्व भीती नाहीशी झाली. त्याने भेट देण्याचे वचन दिले, आणि मला खात्री दिली कि येशु मदत करेल.

मला सर्वात जास्त खात्री आहे, या लोकांच्या प्रार्थनांनी मला त्या पहिल्या ऑपरेशनमधून तारले. या तणावाच्या वेळामध्ये त्यांनी मला भेटणे चालू ठेवले आणि बायबलमधून येशुबद्दल अजून शिकवले. माझे डोळे उघडले आणि प्रथमच मी ओळखले कि भगवान येशु ख्रिस्त हाच एक देव आणि मनुष्यामधला मध्यस्थ आहे. त्यानंतर मी प्रार्थना केली आणि खुशीने त्याला माझा देव आणि उद्धारक म्हणून स्विकारले आणि त्याच्या अत्यंत जवळीकीच्या खात्रीचा आणि शांततेचा अनुभव घेतला.

पहिल्या ऑपरेशनमधून बरे झाल्यानंतर, मला हॉस्पीटलमधून सोडले गेले आणि घरी पाठवले गेले अशा समजूतीने कि मी हॉस्पीटलमधील दवाखान्यात आठवड्यातून एकदा भेट दिलीच पाहीजे.

अखेरीस, दुसऱ्या ऑपरेशनची वेळ आली ज्यामध्ये ते माझे आयुष्य वाढविण्याचा एक शेवटचा प्रयत्न म्हणून माझा व्हॉइस बॉक्स काढून टाकणार होते. दरम्यानच्या काळात, माझ्या नवीन ख्रिश्चन मित्रांनी बायबलमधून ‘तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा’…..’मी परमेश्वर आहे. तुम्हाला बरे करणारा मीच आहे’ (एक्सोडस 15:26), आणि, ‘माझ्या प्रिय मित्रा, जसे आध्यात्मिक जीवनात तुझे चांगले चालले आहे हे मला माहीत आहे तसेच इतर बाबतीतही तुझे चांगले चालावे आणि तुझे आरोग्य चांगले असावे अशी मी प्रार्थना करतो’ (3 जॉन 2) ही दोन वचने माझ्याबरोबर सहभागी करून मला खात्री दिली होती कि येशु मला बरे करू शकतो. येशु स्वतः म्हणाला होता, ‘मी मेलो होतो; पण पहा, मी अनंतकाळासाठी जिवंत आहे. आणि माझ्या जवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत: (रिव्हिलेशन 1:18). जरी मी माझ्या डॉक्टरमध्ये नेहेमी पूर्ण विश्वास ठेवला, त्याच्या प्रत्येक शब्दावर अवलंबून राहीलो, तरी मला आता येशु आणि त्याच्या शब्दांमध्ये अधिक मोठा विश्वास वाटत होता.

एका रात्री हॉस्पीटलमध्ये दुसऱ्या ऑपरेशनसाठी पुन्हा आल्यावर, जवळच्या एका खाटेवरचा एक तरूण मनुष्य त्याच्या पोटातील दुखण्यामुळे ओरडू लागला. त्याच्यासाठी एका खोल सहानुभूती माझ्या हृदयात भरून आली. मी त्याच्या खाटेजवळ गेलो, माझा हात उचलला आणि म्हणालो, ‘भगवान येशु, हा तरूण मनुष्य त्रास सहन करत आहे आणि किती वेदनांमध्ये. त्याच्यावर दया कर आणि त्याचे दुःख दूर करः ताबडतोब, तो पूर्णपणे त्याच्या पायांवर बरा होऊन उभा राहीला! अशा या अनुभवानंतर, मी तेव्हाच आणि तेथे ठरवले कि माझे दुसरे ऑपरेशन न होऊ देणे, कारण खात्रीने तोच येशु ज्याने या तरूण माणसाला बरे केले तो मला सुद्धा बरे करील. त्याच आठवड्यात मी हॉस्पीटल सोडले आणि घरी गेलो, डॉक्टरांच्या सर्व इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून.

नंतरच्या आठवड्यात, मला माझ्या हॉस्पीटलमध्ये न परतण्याबद्दल कारणाच्या चौकशीची तीन पत्रे मिळाली. तिसऱ्या पत्रामध्ये माझ्या आजाराचे सर्व भीतीदायक तपशील होते आणि त्यांच्या विश्लेषणाप्रमाणे, मी अगदी मरूपण शकत होतो. आणखी पुढे, जर मरण आले, तर त्यांना जबाबदार धरले जाऊ नये! या शेवटच्या पत्राने पूर्ण गोष्टीबाबत मला गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडले, पण मी जितके अधिक देवाचा शब्द वाचत होतो, तितके अधिक माझ्या हृदयांत आंतरीक शांतता आणि धाडस जमा होत होते.

काही काळानंतर, मला माझ्या श्वासनलिकेत वाढत असलेल्या ट्युमरमुळे श्वासोच्छवास करण्यास अतिशय त्रास होऊ लागला. सर्व डॉक्टरांनी मला याबद्दल चेतावणी दिली होती कि असे होईल, आणि मी आता ओळखले कि ख्रिस्त एक बरे करणारा म्हणून असलेल्या माझ्या विश्वासाची पारख होणार आहे.

एके दिवशी प्रार्थना करत असताना, एक आवाजाने माझे नांव घेतले आणि म्हटले, ‘जर तुला जुन्या घरात जायचे असेल, तर तू प्रथम काय करशील?’ हे ओळखून कि तो देव होता, मी उत्तरलो, ‘मला ते स्वच्छ करावे लागेलः नंतर त्याने स्पष्ट केले, ‘मला तुला माझे देऊळ बनवायचे आहे, पण अगोदर, तु पूर्णपणे स्वच्छ झाला पाहीजेसः मला माहीत झाले कि येशुने मला क्षमा केली आहे आणि मला त्याचे मुल बनवले आहे, पण मी खरोखर कधीही माझी पापे पूर्णपणाने कबूल केली नव्हती. देवाकडे ती कबूल केल्यानंतर, माझ्या पूर्ण अपात्रतेच्या उत्कट भावनांनी मला घेरले आणि मी त्याच्या पवित्र उपस्थितीत फक्त अश्रु गाळण्याशिवाय काही करू शकत नव्हतो. माझ्याजागी येशु त्या क्रॉसवर मरण पावला! एक खोल कृतज्ञता त्यासाठी जे येशुने केले माझ्या आत्म्यामध्ये भरून आली आणि प्रार्थनेच्या त्या वेळी उठताना, मला शुद्ध, मुक्त आणि माझ्या श्वासोच्छवासाच्या अडथळ्यातून पूर्णपणे मोकळे वाटू लागले.

एका सकाळी, मला श्वासोच्छवासामध्ये पूर्वी इतका कधीही अनुभवला नव्हता तितका त्रास जाणवून जाग आली. प्रत्येक श्वास जीवन आणि मृत्युमधील लढाई होत होती. कसातरी मी माझ्या गुडघ्यांवर बसलो, मी माझ्या हृदयाच्या गाभ्यातून हाक दिली, ‘देवा येशु, जर मला बरे करशील, तर मी तुझ्यासाठी काहीतरी करेन!’ अर्थातच, तो फक्त त्याच्या इच्छेला माझे पूर्णपणे शरण जाण्याची वाट पहात होता. अचानक मी आतपासून खोकलो, आणि काहीतरी विचित्र माझ्या तोंडातून वर आले. ते माझ्या हातावर थुंकले, मी पाहू लागलो ते काय होते… तो ट्युमर होता! अखेरीस मी मुक्त झालो होतो! येशुने मला बरे केले होते जसे त्याच्या शब्दांनी वचन दिले होते. देवाचा गौरव असो! परंतु अजून एक चमत्कार आहे जो सांगितलाच पाहीजे.

पुन्हा एकदा सामान्यपणे खाणे आणि श्वास घेण्यास सक्षम होण्यात किती आनंद होता, परंतु काहीतरी अजून माझ्या घशात राहीले होते – ‘ट्रॅचिअल ट्युबचा’ एक भागः डॉक्टरनी तो काढला नव्हता, असा विचार करून कि मी दुसऱ्या ऑपरेशनसाटी परत येईन. कधीकधी ही वस्तु अतिशय वेदना देणारी आणि चिडचिडे करणारी होत असे, म्हणून मी देवाला ती माझ्या घशातून काढून टाकण्यास सांगू लागलो, जसे त्याने ट्युमर काढला होता तसे. प्रत्येक वेळी जेव्हा मी प्रार्थना करत असे, ती खरेतर माझ्या घशात अधिकाधिक आत जात होती; पण त्यामुळे अतिशय वेदना होत होत्या आणि बरेचदा रक्त वाहणे चालू होत होते. शेवटी मी त्याबद्दल प्रार्थना करायचे पूर्णपणे थांबवले आणि देवाची त्याच्या प्रेमाबद्दल स्तुती करणे चालू केले.

नंतर एक दिवशी माझ्या मनात प्रार्थनेचा एक वेगळा मार्ग आला. मी येशुला माझ्या घशातील ही वस्तु बाहेर काढून टाकण्यापेक्षा घशातच वितळवून टाकण्यास सांगितले. खात्रीने, देवाला अगदी तेच करायचे होते…. आणि त्याने ते केले! त्याने ते पूर्णपणे वितळवून टाकले!

डॉक्टरनी मला जगण्यासाठी फक्त सहा महीने दिले होते, पण अनेक वर्षे गेली आहेत आणि ही सर्व त्याच्या महिम्याची प्रशंसा असो मी अजूनही जिवंत आणि निरोगी आहे! तेथे कोणत्याही जखमेच्या खूणेचे चिह्न अर्थातच नाही, आणि तेव्हापासूनची केलेल्या माझ्या शारिरीक तपासणीत आणि एक्स-रे हीच वस्तुस्थिती सिद्ध करतात कि येशुने मला पूर्ण बरे केले आहे.

त्या वेळेपासून मी देवाचा आज्ञाकारी झालो आहे त्याच्या शब्दाप्रमाणे पाण्यातून बाप्तिस्मा घेऊन, आणि भगवान येशुनेही मला दोन भिन्न, परंतु देवाच्या प्रत्येक मुलासाठी अत्यावश्यक अनुभव देऊन पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा दिला आहे

म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नांवाने बाप्तिस्मा द्या.

तुमची हृदये व जीविते बदला आणि येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही प्रत्येकाने बाप्तिस्मा घ्यावा. मग देव तुमच्या पापांची क्षमा करील आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल (मॅथ्यु 28:19, आणि ऍक्ट्स 2:38 वाचा)

एकनिष्ठ राहाणे! त्या वचनामध्ये जे मी देवाला त्या दिवशी दिले जेव्हा त्याने मला बरे केले कि मी त्याची सेवा करत राहीन आणि प्रत्येकाला येशुने ज्या महान गोष्टी केल्या आहेत आणि अजूनही करू शकतो त्या सांगत राहीन. तो खरा देव आहे!

आजच तुमचे पूर्ण आयुष्य त्याला का वाहत नाही? जर तुम्ही आजारी असाल किंवा कोणतीही गरज असेल, येशूला हाक मारा. कारण त्याने वचन दिले आहे, ‘जर तुम्ही माझ्या नांवाने माझ्याजवळ काहीही मागितले, तर ते मी करेन.’ (जॉन 14:14)

“हे काही गुप्त नाही कि देव काय करू शकतो, जे त्याने इतरांसाठी केले आहे ते तो तुमच्यासाठी करेल!”

केली एम बर्क

 

You can find equivalent English tract @

The Real God