the amazing grace of godthe-amazing-grace-of-god-page-22

देवाची विस्मयकारक कृपा

 

मी 14 वर्षांचा होईपर्यंतच, मी अगोदर एक दारूड्या झालो होतो, एक मद्यपी सर्व प्रकारच्या कल्पना करू शकल्या जातील त्या विकृती आणि अनीतीमध्ये जगत होतो. मी व्हिस्की चमच्याने पिण्यास सुरवात केली आणि पाच गॅलनच्या कॅनमधून पिण्यापर्यंत शेवटी आलो! कोणत्याही योग्य ख्रिश्चियन शिस्तीशिवाय, माझा भाऊ आणि मी जंगली जनावरांप्रमाणे वाढलो. सैतान, ‘या जगाचा राजपुत्र,’ त्याने मला आंधळे केले होते आणि मी एक घृणास्पद, स्वार्थी, पापी आणि विनाशकारी आयुष्य जगत होतो. ‘लोकांना वाटत असते हाच मार्ग बरोबर आहे. पण तो मार्ग फक्त मरणाकडे नेतो.’

वयाच्या 31 व्या वर्षी, माझे पापी आयुष्य एका पराकाष्ठेला आले. एका रात्री उशीरा, मी पूर्ण प्यायलेल्या अवस्थेत घरी आलो आणि त्या लोकांबरोबर वादावादी चालू केली जे माझ्याबरोबर राहात होते. त्यांनी मला धमकावले आणि मी अचानक घाबरू लागलो. जो सैतान येतो ‘तो चोरी करायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो’ त्याने मला त्या चारीजणांना माझ्या .38 कॅलिबर पिस्तुलाने ठार मारण्यासाठी पटविले. त्यांना गोळी घातल्यानंतर, त्याने मला स्वतःला ठार मारायला सांगितले, म्हणून मी स्वतःला गोळी मारली पाच वेळाः दोन वेळा पोटामध्ये, एकदा प्रत्येक फुफ्फुसामध्ये आणि एकदा माझ्या डोक्यामधून.  अचानक, एक तेजस्वी प्रकाश माझ्या सभोवताली चमकू लागला आणि मी एक प्रबळ वाऱ्याचा आवाज माझ्याकडे येत असल्याचे ऐकले. जसे टेलिव्हिजन पडद्यावर दाखवतात, देवाच्या आत्म्याने माझी सर्व पापे अगदी माझ्या बालपणापासून दाखविली. हे ओळखून कि मी एक पराभूत पापी नरकाच्या मार्गावर जात आहे ‘पापाची मजुरी मृत्यु आहे’ मला नरकातला अग्नी माझ्या आत्म्यात जळत असल्याचे जाणवत होते. तेव्हा तो आत्मा म्हणालाः ‘जो देवाच्या नांवाने हाक मारतो त्याला वाचवले जाईल.’ धूर सोडणारी बंदूक तेव्हा माझ्या हातात असताना आणि माझ्या शरीरातून रक्त वाहत असताना, मी त्या रात्रीत बाहेर धडपडत ओरडलो, ‘देवा येशू, मला वाचव!’

ताबडतोब; काहीतरी असामान्य घडू लागले आणि मी देवाचे दूत आणि दुष्ट आत्म्यांमध्ये होत असलेल्या लढाईबद्दल अत्यंत जागरूक झालो. देवाचे आत्मे माझ्यावर भडकलेल्या अग्नीप्रमाणे आले, आणि दारू, धूम्रपान, व्यभिचार, ईशनिंदा, इत्यादी सर्व अशुद्ध भुते नष्ट केली. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मला या सर्व पापांपासून शुद्ध केले आणि एक महान शांतता आणि आनंद माझ्या हृदयांत भरून आला. मी देवाचे मुल म्हणून ‘पुन्हा जन्माला आलो.’ सैतानाच्या शक्तीत मी आता कैदी नव्हतो. तेव्हा येशून मला पवित्र आत्म्याने भरून टाकले आणि स्वर्गीय प्रशंसा एका नवीन आणि अनोळखी भाषेतून माझ्या मुखातून वाहू लागली! त्यावेळी अजूनही माझ्या जखमी अवस्थेत मी धडपडलो आणि असहायपणे एका रेल्वेरूळांवर पडलो. माझे शरीर थंड पडत चालले होते जसे माझे रक्त वाहणे चालू होते; आणि तेव्हा, भीतीदायकपणे, मी एक ट्रेन येताना पाहीली! सैतान मला ठार मारण्याचा प्रयत्न करत होता, पण देवाने मला चमत्कारीपणे एका पोलिसाला पाठवून वाचवले ज्याने ट्रेनला झेंडा दाखवून थांबवले. त्या पोलीसाने मला सिगारेट देऊ केली, पण आता, काही अजब कारणाने, मला ते काहीतरी अशुद्ध वाटले. देवाने मला माझ्या वाईट सवयींपासून पूर्ण मुक्त केले होते आणि मला एक नवीन जीवन दिले होते. देवाची कृपा किती आश्चर्यजनक आहे! हॉस्पीटलमध्ये नेल्यानंतर, आमची आयुष्ये वाचवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले होते आणि आम्हाला मरण्यासाठी सोडून देण्यात आले होते. तरीही, देवाने काही ख्रिश्चनांना आमच्यासाठी प्रार्थना करण्यास पाठवले आणि आम्ही सर्व पाची जण ताबडतोब बरे झालो. येशू फक्त आत्म्याचा उद्धारकच नाही तर शरीर बरे करणाराही आहे. ‘येशूने शब्द बोलून ती भुते घालविली आणि सर्व रोग्यांना बरे केले…. ‘आणि’….ज्याच्या जखमांमुळे तुम्ही बरे झालात.’ देवाचे मार्ग परिपूर्ण आणि समजण्यापलिकडले असतात.तो छोट्या चिमण्यांचा विचार करतो, मग त्यांचा किती करत असेल जे त्याच्याकडे वळतात. येशू ख्रिस्त माझा उद्धारक, माझा उपचारक, बनला, आणि लवकरच नंतर माझा ‘वकीलही’ बनला. माझ्या कोर्टकेसच्या दिवशी, मी न्यायाधीशासमोर असहायपणे उभा होतो. सर्व काही माझ्या विरूद्ध होते, पण देवाने न्यायाधीशाचे हृदय स्पर्शिले आणि त्याने मला फक्त 20 वर्षांची शिक्षा दिली. जरी मला तुरुंगात वेळ घालवायचा होता, तरी माझा आत्मा पक्ष्याप्रमाणे मुक्त झाला होता कारण देवाने मला अद्भुतपणे बदलले होते. ‘जो प्रत्येक पाप करतो तो गुलाम आहे. पाप त्याचा मालक आहे…. म्हणून जर पुत्र तुमची सुटका करतो तुम्ही खरोखरच मोकळे व्हाल.’ माझ्या मनात एक इच्छा भरून राहीली येशूबद्दल अधिक जाणून घेण्याची आणि मी प्रार्थना केली कि देव मला ह्या वेळी तुरूंगात मदत करेल. माझ्या तुरूंगातील खोलीमध्ये प्रथमच प्रवेश करताना, पवित्र आत्म्याने मला माझ्या बिछान्याखाली पाहाण्यास सांगितले. चटईखाली पाहातो तर काय महान आश्चर्य, मला एक नवेकोरे बायबल मिळाले. हालेलुआ! फक्त एकच अडचण होती कि मी कधीही वाचायला शिकलो नाही, पण देव जो सर्व गोष्टी बरोबर करतो, मला दिवसानुदिवस वाचायला शिकवणे सुरू केले.

देवाचा शब्द वाचत असताना, मला आढळले जेथे साउल, एक ज्यू फारीसीने सुद्धा लक्षणीय बदल अनुभवला आहे. तो, आजकालच्या काही लोकांसारखा, विश्वास करत नव्हता कि येशू देवाचा पुत्र, प्रेषित आहे. म्हणून, त्याच्या धर्मपरायणतेने त्याने त्याच्या वेळेच्या अनेक ख्रिश्चनांना ठार मारले होते. तरीही देव, जो दयेने श्रीमंत आहे, अशा मनुष्याला सुद्धा वाचवू शकला. मी हेही वाचले कि त्याच्या बदलानंतर तीन दिवसांनी, साउलला(आता पॉल म्हणून ओळखले जाते) पाण्यामधून बाप्तिस्मा दिला गेला आणि देवाने त्याला पवित्र आत्म्याने भरून टाकले. म्हणून, कारण ह्या अनुभवाची माझ्या बदलासाठी कमतरता पडत होती, मी देवाची स्वेच्छेने आज्ञा पाळली आणि पहिल्या प्रथम जी संधी मिळाली तेव्हा पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतला. तुरूंगात मी रेडिओवरील अनेक प्रसारणे ऐकली आणि पत्रव्यवहार कोर्ससाठी लिहिले, पण त्यांच्या साहीत्याने मला अजून अधिक गोंधळात टाकले. नंतर देवाने मला ती सर्व पुस्तके नष्ट करण्यास सांगितली म्हणजे तो स्वतः मला त्याचा शब्द बायबलमधून शिकवू शकेल. ‘जे्व्हा तो, सत्याचा आत्मा आला आहे, तो तुम्हाला सर्व सत्याकडे घेऊन जाईल’ आणि ‘तुम्हाला कोणत्याही मनुष्याने शिकवण्याची गरज नाही….तोच तुम्हाला सर्व गोष्टी शिकवेल…’ देवाचा शब्द माझ्यासाठी दिवस आणि रात्रीसाठी आनंद झाला. आराम, ताकद आणि मार्गदर्शनाचा स्त्रोत म्हणून, त्याच्या शब्दाने मला तुरूंगातील माझ्या सर्व वर्षांत एक पवित्र आणि विजयी आयुष्य जगण्याची क्षमता दिली. येशूच्या प्रेमाने बांधला जाऊन, इतर ख्रिश्चनांबरोबर आम्ही आमच्या बरोबरच्या कैद्यांना बायबल शिकविण्यासाठी आणि आजाऱ्यांसाठी प्रार्थना करण्यास सुरवात केली. आम्ही खूप अत्याचार सहन केले आणि अनेक वेळा आम्हाला ठार मारायच्या धमक्या दिल्या गेल्या परंतु आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाचा जप आणि त्याचा गौरव चालू ठेवला. अखेरशेवटी, 13 वर्षांनंतर चांगल्या वागणुकीसाठी वेळ कमी केला जाऊन मला मुक्त करण्यात आले. नंतर जसे पीटरला तुरूंगातून सोडल्यानंतर एक प्रार्थना करणाऱ्या संतांच्या गटाकडे नेले गेले तसे देवाने अद्भुतपणे मला त्याची प्रार्थना करणाऱ्या काही संतांकडे नेले ज्यांनी त्याची सेवा करण्यासाठी सर्व काही त्याग केले होते. नंतर थोड्याच काळाने, मी सुद्धा माझे पूर्ण आयुष्य त्याला वाहीले ज्याने माझ्यासाठी स्वतःला क्रुसावर दिले होते. मी नेहमी आश्चर्याने स्वतःला विचारत असे, ‘देवाने माझ्यासारख्या कवडीमोल असलेल्याला त्याच्या सेवेसाठी का निवडले असावे?’ ‘जगातले जे मूर्ख पण त्यांना त्याने निवडले; यासाठी की, शहाण्या माणसास फजित करावे, आणि देवाने दीन, तुच्छ मानलेले, जे नगण्य त्यांना निवडले. यासाठी की जे काहीतरी आहेत त्यांना नगण्य करावे. यासाठी की कोणी देवासमोर बढाई मारू नये.’ नक्कीच त्याचा शब्द खरा झाला आहे!

माझ्या मित्रा, जर देव माझ्यासारख्या पाप्याला वाचवू शकतो, तो तुलाही वाचवू शकतो. तो कोणालाही वाचवू शकतो. जे रक्त येशूने क्रुसावर जगाच्या सर्व पापांसाठी सांडले ते अजूनही त्याच्याकडे प्रामाणिकपणे येतात त्या कोणत्याही पाप्याला शुद्ध, मुक्त करू शकते आणि वाचवू शकते. का नाही आजच तुमचे आयुष्य त्याला वाहून देत? येशू ख्रिस्त लवकरच येतो आहे! तो तुम्हाला एक पवित्र आणि विजयी आयुष्य जगायला मदत करू शकतो त्या दिवसाची वाट पाहाण्यासाठी. माझ्याकडे अर्पण करण्यासाठी सगळे विश्व जरी असले तरीही ते खूप छोटे पडेल, प्रेम असे अद्भुत, असे दैवी, माझे जीवन, माझा आत्मा, माझे सर्व मागणारे आहे!

यापुढे ‘माझ्यासाठी जगणे म्हणजे ख्रिस्त होणे, आणि मरणे म्हणजे मिळवणे!’

सेवा करण्यासाठी वाचवला गेलेला, सॅम्युएल ड्रेन

प्रार्थनाः हे पित्या, मी माझ्या सर्व पापांसाठी प्रायश्चित्त करतो (तुमची पापे तपशीलवार कबूल करा). मला क्षमा कर, आणि तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मला शुद्ध कर. तुझ्या पवित्र आत्म्याने मला बंदीस्त कर आणि लवकरच येत असणाऱ्या ख्रिस्तासाठी मला तयार कर; येशूच्या नांवाने, आभारी आहे प्रभु! आमेन.

बायबलचे संदर्भ : ‘प्रॉव्हर्ब्स 14:12; जॉन 10:10; रोमन्स 6:23; रोमन्स 10:9-13; जॉन 3:3-5; ऍक्ट्स 2:1-4; I कॉरिंथियन्स 14:2, 14:18; मॅथ्यु 8:16,17; I पीटर 2:24; जॉन 8:34,36; ऍक्ट्स 9:1-20; जॉन 16:13; I जॉन 2:27; ऍक्ट्स 12:1-17; ल्युक 14:26-33; I कॉरिंथियन्स 1:26-29; फिलिप्पियन्स 1:21

 

You can find equivalent English tract @

The Amazing Grace of God