20 / 100

famous last words page1(marathi)famous last words page2(marathi)

Download PDF Tracts

शेवटचे प्रसिद्ध शब्द

आमच्या देशात असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते, शेवटचे प्रसिद्ध शब्द, साधारणपणे शंकास्पद रित्या म्हटले जातात, आम्हाला आमचा श्वास रोखून धरण्यास भाग पाडतात आणि विशिष्ट दुर्घटना घडण्याची अपेक्षा करतात. परंतु अनेक पुरूष आणि स्त्रीया, या यात्रेतून ज्याला जीवन असे म्हटले जाते त्यातून प्रवास केल्यावर, त्याच्या पूर्णत्वाकडे आल्यावर, नीतीमत्ता लुटली गेल्यावर आणि अनंतकाळाला सामोरे जाताना, त्यांचे अनेक लक्षवेधी शेवटचे शब्द आहेत. काहीजण ते आनंदाच्या भरात उद्गारतात, इतर ते भयंकर भीतीमध्ये बोलतात जेव्हा निष्ठूर काळ घाला घालण्यास येतो.

मरण! एक न टाळता येण्याजोगी समाप्ती, आपल्या योजनांची, इच्छांची, हेतू, उद्देश, तत्वज्ञान, विचार केलेल्या पद्धती इत्यादीची. ती तरूण आणि वृद्ध, श्रीमंत आणि गरीब, बंधक आणि मुक्त, राजा आणि राजकुमार, ते रस्त्यावरील भिकारी सर्वांसाठी घडते.

“ही शोकाची गोष्ट आहे कि मनुष्यांनी ज्या जगात जन्म घेतला आहे त्याचा शेवट तोपर्यंत ते जाणत नाहीत जोपर्यंत ते तिथून बाहेर जाण्यास तयार होत नाहीत.”

शेवटच्या प्रसिद्ध शब्दांचे हे संकलन वाचकाची खात्री पटविण्यासाठी आहे कि मृत्युपश्चात जीवन अस्तित्वात आहे, आणि देवाचा पुत्र, येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त केलेले जीवन कसे अनंतकाळासाठी असते. जेव्हा तुमच्या मरणाची वेळ येईल, तुम्हाला भीती वाटेल, कि तुमच्याकडे जनरल विल्यम बूथ, साल्वेशन आर्मीचा संस्थापक, ह्याची पत्नी कॅथेरीन बूथ हीच्यासारखे शेवटचे शब्द असतीलः

“पाणी वाढत आहे, पण तसेच मी सुद्धा. मी खाली जाणार नाही, तर वर जाईन. मरणाबद्दल चिंता करू नका, चांगले जगणे चालू ठेवा, मरणही चांगले येईल.”

तुमची इच्छा एक राजा, प्रेसीडेंट किंवा महान राजकीय नेता होण्याची आहे का? लुईस चौदावा, फ्रान्सच्या राजाचे त्याच्या मुलाकडे 1715 मध्ये निरोप घेताना बोललेल्या ह्या शब्दांचा विचार कराः

“माझ्या मुला, मी कदाचित एक चांगले आयुष्य जगलो असतो, माझ्या चुकांपासून बोध घे, आणि लक्षात ठेव राजे इतर माणसांसारखेच मरतात”

राजे इतर माणसांसारखेच मरतात!

सेव्हेरस (146 – 211), ख्रिस्तजन्मानंतरच्या 3ऱ्या शतकातील रोमन सम्राट, त्याच्याकडे त्याच्या जीवनाची ही निराशाजनक बेरीज होतीः

“मी सर्व काही होतो, आणि सर्व काही हे काहीही नाही. एका छोट्या कलशात एखाद्याचे सर्व अवशेष राहातील ज्याच्यासाठी पूर्ण जग हे इतके छोटे होते.”

खलीफा अब्दुल-इ-रहमान 111(ख्रिस्तजन्मानंतर 961वर्ष), स्पेनचा सुलतान, ह्याने आनंद त्याच्या हातातून निसटून जातानाच्या दुर्दैवाचा अनुभव घेतला:

“पन्नास वर्षे उलटली आहेत जेव्हा मी पहीला खलीफा होतो. श्रीमंती, आदर, सौख्य, मी सर्वांचा आनंद घेतला आहे. या आनंदी दिसणाऱ्या दीर्घ कालावधीत, मी ते दिवस मोजले जेव्हा मी खरोखर आनंदी होतो, ते चौदा आहेत!”

कल्पना करा! राज्यकर्ता म्हणून 50 वर्षे, फक्त 14 दिवस आनंदात घालवले.

कदाचित तुम्ही नास्तिकता किंवा अज्ञेयवादाचे तत्वज्ञान अभ्यासत असाल. यापैकी बरेच लोकांना त्यांच्या आयुष्यांच्या जबाबदारीतून देवासमोरून सुटका करून घ्यायला आवडेल, असे जाहीर करून कि तो अस्तित्वात नाही. ते त्यांना स्वतःला “स्वेच्छेने अज्ञानी” बनवत आहेत या वस्तुस्थितीपासून कि “परमेश्वराने आज्ञा केली आणि जगाची निर्मीती झाली. देवाच्या तोंडातल्या श्वासाने पृथ्वीवरील सर्व गोष्टी निर्माण झाल्या.” (साम 33:6) असा एक माणूस होता व्होल्टायर, प्रसिद्ध फ्रेंच तत्ववेत्ता आणि 19व्या शतकातील धर्मनिंदक. ख्रिस्ताबद्दल, तो एकदा म्हणालाः “अभाग्याचा धिक्कार असो.”

एकदा त्याने बढाईने सांगितले, “20 वर्षांत ख्रिस्तधर्म संपून जाईल. माझ्या एका हाताने ती इमारत नष्ट होईल जी तयार करण्यास 12 धर्मगुरू लागले.”

त्याचा शेवट भयानक होता: “मला देवाने आणि मानवाने टाकून दिले आहे! मी तुला माझे जे मूल्य आहे त्यातले अर्धे देईन जर मला सहा महिन्याचे आयुष्य दिलेस, नंतर मी नरकात जाईन आणि तू माझ्याबरोबर जाशील, ख्रिस्ता, हे येशू ख्रिस्ता!

दुर्दैवाने, त्याच्यावर कृपा होण्याचे दिवस कधीच उलटून गेले होते.

थॉमस पाइन हा एक प्रसिद्ध अमेरिकन देशभक्त आणि धर्मनिंदक होता ज्याने एज ऑफ रिझन नांवाचे ईशनिंदा करणारे आणि बायबलविरोधक पुस्तक लिहीले. त्याचाही शेवट तसाच भयानक झालाः

“मी सगळी विश्वे दान करीन, जर ती माझ्याकडे असतील तर, कि एज ऑफ रिझन प्रकाशित होऊ नये म्हणून. हे प्रभु, मला मदत करा! ख्रिस्ता मला मदत करा! हे देवा, मी काय केले आहे कि इतके दुःख भोगत आहे? पण देव नाहीच आहे! कारण जर तेथे देव असेल तर माझे पुढे काय होईल? देवासाठी माझ्याबरोबर राहा! एका मुलाला तरी माझ्याबरोबर राहाण्यास पाठव, कारण एकटे राहाणे म्हणजे नरक आहे. जर सैतानाचा कुणी दलाल असेल, तर तो मी आहे.”

अगदी काही देवाच्या सेवकांनीसुद्धा, हे आयुष्य संपत आल्यावर, त्यांच्या स्वतःच्या आयुष्याच्या उपयोगीपणाबद्दल शंका घेतली आहे. थॉमस वॉलसे, रोमन कॅथॉलिक कार्डिनल आणि आठव्या हेनरीच्या राज्यकाळातील राजकारणी, त्याचे मरणपंथावरील हे बोल होतेः

“जर मी देवाची तेवढ्या परिश्रमपूर्वक सेवा केली असती जेवढी राजाची केली, त्याने मला माझ्या वृद्धपणात सोडून दिले नसते. पण हे एक न्यायपूर्ण बक्षीस आहे जे मला माझ्या अविरत वेदनांमध्ये मिळाले आहे आणि ती शिकवण कि मी त्याची सेवा करावयास हवी होती, आणि देवासाठी मी सेवा करण्याला महत्व न देता, फक्त राजाच्या इच्छा पूर्ण केल्या.”

ह्या शब्दांची मॅथ्यु हेनरी, प्रसिद्ध इंग्लिश धर्मअभ्यासकाच्या शेवटच्या शब्दांबरोबर तुलना कराः

“देवाच्या सेवेत, आणि त्याच्याबरोबर जिव्हाळ्यामध्ये घालवलेले आयुष्य, हे एखाद्यासाठी या सध्याच्या जगातील सर्वात आरामदायक असणारे असे आयुष्य आहे.”

आणखी जोनाथन एडवर्डस, अठराव्या शतकाच्या मध्यावरील एक ख्यातनाम गॉस्पेल गुरू, अतिशय समाधानी होता कि त्याची वेळ आली आहे. त्याचे निरोपाचे शब्द होतेः “येशू, माझ्या कधीही दगा न देणाऱ्या मित्रा, तू कोठे आहेस?”

शेवटच्या शब्दांची ही यादी काही शहीदांच्या शब्दांशिवाय पूर्ण होणार नाही, ते ज्यांनी त्यांची आयुष्ये ख्रिस्तासाठी अर्पण केली, सत्य आणि गॉस्पेलसाठी त्यांच्या आयुष्याचा बिल्कुल विचार न करता. पॉलीकार्प असा एक होता. हा दुसऱ्या शतकातील शहीद, त्याच्या शहराच्या रोमन राज्यकर्त्याकडून त्याला ख्रिस्ताबद्दलचे मत बदलण्याची आणि ख्रिस्ताची निंदा करण्याची आज्ञा झाली तेव्हा त्याचे उत्तर असे होतेः

“ऐंशी आणि सहा वर्षे मी आता ख्रिस्ताची सेवा केली आहे, आणि त्याने माझे कधीही थोडेसुद्धा वाईट केले नाही, मग आता मी माझा राजा आणि उद्धारकाची निंदा कशी करू शकतो?”

जेव्हा वधस्तंभावर त्याला जाळले जात होते, तेव्हाही त्याने देवाने त्याला जवळ ठेवल्याबद्दल, त्याचे तारण केल्याबद्दल, आणि त्याला शहीदांच्या सहवासात येण्याची परवानगी दिल्याबद्दल देवाच्या प्रशंसेशिवाय काहीही केले नाही.

एक शतकानंतर, ऍन्ड्रॉनिकस नांवाचा एक माणूस, त्याला जखमी करून त्याच्या वाहत्या जखमांवर मीठ चोळून, त्याला जंगली पशूंमध्ये फेकण्यात आले आणि नंतर तलवारीने ठार मारण्यात आले. त्याचे शेवटचे शब्द होतेः

“तुम्हाला जितके वाईट करता येईल तितके करा! मी ख्रिश्चन आहे; ख्रिस्त माझा सहायक, माझा पाठीराखा आहे, आणि या शस्त्रांसह सज्ज होऊन, मी तुमच्या देवाची कधीही सेवा करणार नाही, मी तुमच्या शक्तीला किंवा तुमच्या मालकाला, सम्राटाला भीत नाही तुमचे यातना देणे तुम्हाला हवे तेव्हा चालू करा, आणि तुमचा दीर्घद्वेष जितके उपाय शोधून काढील त्या सर्वांचा उपयोग करा, आणि तुम्ही शेवटी पहाल कि मी माझ्या निश्चयापासून बिल्कुल ढळणारा नाही.”

याची तुलना चर्चला मनस्ताप देणाऱ्या एकाच्या शेवटाबरोबर करा. स्टिफन गार्डिनर, विंचेस्टरचा 16 व्या शतकातला बिशप होता. कॅथॉलिक राज्यकर्त्यांचे हे रक्तशोषी साधन, त्याच्या शेवटच्या दिवशी एका प्राणघातक रोगाने मरण पावला, त्याच्या तोंडात हे शाप होतेः

“मी पीटरसारखे पाप केले, पण मी त्याच्यासारखा रडलो नाही.”

अखेरशेवटी, आमच्याकडे ख्रिस्ताचे शेवटचे शब्द आहेत. क्रुसावर, त्याचा छळ करणाऱ्यांना पूर्ण क्षमा करून, त्याने प्रार्थना केलीः

“हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण त्यांना कळत नाही कि ते काय करत आहेत.”

त्याच्या बाजूच्या क्रुसावरील चोराने केलेला पश्चात्ताप स्विकार करून, तो म्हणालाः

“आज तू माझ्याबरोबर स्वर्गात असशील.”

देवाची सर्व इच्छा पूर्ण केल्यानंतर, तो विजयाने ओरडलाः

“हे संपले आहे”

त्याच्या पित्याकडे, पूर्ण विश्वास आणि प्रेमाने तो म्हणालाः

“हे पित्या, तुझ्या हातात मी माझ्या आत्म्याला सोपवतो.”

“प्रिय मित्रा, तुझ्यासाठी पूर्ण मुक्ती त्या खडबडीत क्रुसावर 2000 वर्षांपूर्वीच खरेदी केली गेली. परंतु, तुझे आयुष्य कोणत्या दिशेने जात आहे? जर तू 70, 80 किंवा अगदी 90 वर्षांचे आयुष्य जगलास, तरी त्याचा तुला काय फायदा जरी तू पूर्ण जग मिळवलेस, पण तुझा स्वतःचा आत्मा हरवलास तर?

येशू ख्रिस्त तुझ्या हृदयाला बोलावत आहे. आजच तू तुझ्या पापांचे प्रायश्चित्त करणार नाहीस का? आणि तुझे आयुष्य त्याच्या इच्छेसाठी वाहून घेणार नाहीस का? तू त्याला तुझ्या जीवनाचा शासक आजपासून आणि यापुढे होऊ देणार नाहीस का? फक्त तेच एक जीवन आहे जे तुला शांतता देईल, कारण देव म्हणतो, “पाप्यांना कधी शांती मिळत नाही.” (इसाया 57:21)

“देवाने जगावर एवढी प्रीती केली कि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे.” (जॉन 3:16)

देव तुमच्यावर प्रीती करतो आणि जे त्याच्याकडे येतात त्यांना अनंतकाळच्या जीवनाची खात्री देतो.

तुमचे जीवन आजच त्याला अर्पण करा!

 

You can find equivalent English tract @

Famous last words