11 / 100

The-one-who-gave-his-life-for-you12

Download PDF Tracts

तो एक ज्याने त्याचे जीवन तुमच्यासाठी दिले

देवाने मनुष्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात तयार केले. त्याचे देवाकडे शिष्यत्व होते, शांतता आणि स्वतःमध्ये आनंद आणि त्याच्या शरीरात चांगला निरोगीपणा होता. पण जेव्हा त्याने पाप केले, त्याने हे देवाबरोबरचे त्याचे शिष्यत्व हरवले, शांतता आणि स्वतःमधील आनंद हरवला, एका दुःखाचा बळी झाला, त्याच्या शरीरातील आजारांना तो बळी पडला, आणि त्याच्या आत्म्यामध्ये, जीवामध्ये आणि शरीरामध्ये अस्वस्थ झाला. अशा मनुष्याची मुक्तता करून त्याला जे त्याने सर्व हरवले आहे ते पुन्हा मिळवून देण्यासाठी, आपला निर्माता देव या जगामध्ये शरीर आणि रक्तासहीत येशूच्या नांवाने सुमारे 2000 वर्षांपूर्वी जन्माला आला. तो पापाशिवाय जन्माला आला होता. या पापी जगात पापमुक्त आयुष्य जगत असताना, तो लोकांचे भले करण्यासाठी सर्व खेड्यांमध्ये आणि शहरांमध्ये गेला. त्याने आंधळ्यांना दृष्टी दिली, बहिऱ्यांना श्रवणशक्ती दिली, मुक्यांना बोलते केले, महारोग्यांना बरे केले, ज्यांना सैतानाने पछाडले होते त्यांना मुक्त केले आणि गरीबांना गॉस्पेलची शिकवण दिली.

रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा होत नाही. कायद्याप्रमाणे, जो म्हणतो कि आत्म्यासाठी प्रायश्चित्त रक्ताने दिले गेले पाहीजे, आमच्या प्रभु येशूने त्याचे रक्त सर्व मानवजातीसाठी सांडायचे ठरवले आणि क्रुसावर मरण्यासाठी स्वतःला शरणागत केले. रोमन सैनिकांनी त्याचा इंचा इंचाने छळ केला, त्यांनी त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट ठेवला, त्याच्यावर सोट्याने प्रहार केले आणि चाबकाने रक्तबंबाळ केले. नंतर त्याला क्रुसावर चढविण्यात आले आणि तीन खिळ्यांवर टांगण्यात आले.

प्रभु येशू, ज्याला पाप माहीत नव्हते, ज्याने कोणतेही पाप केले नव्हते आणि ज्याच्यामध्ये कोणतेही पाप नव्हते, त्याला आमच्या सर्व पापांसाठी जखमी केले गेले. त्याला आमच्या अवज्ञांसाठी इजा केली गेली. ज्याने आम्हांला शांतता मिळवून दिली ती शिक्षा त्याला झाली. पापाची मजूरी मृत्यु आहे. प्रभु येशूने ही शिक्षा स्वतःवर घेतली जी मनुष्यांना त्यांच्या पापांसाठी मिळणार होती आणि अशा प्रकारे तो क्रुसावर मरण पावला.

“परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले कि, तो आमच्यावर फार प्रेम करतो” (रोम 5:8) प्रभु येशू क्रुसावर फक्त मेला नाही, तर जसे त्याने पूर्वी सांगून ठेवले होते, त्याने मृत्युवर आणि नरकावर विजय मिळवला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. तो जो उठला होता, सर्व स्वर्गाच्या वर उंच गेला आणि तरीही आपल्यासाठी जिवंत आहे.

प्रिय मित्रा! जेव्हा तू येशूने तुझ्यासाठी सहन केलेल्या त्रासाचे आणि वेदनांचे चिंतन करशील, तुझे दगडी हृदय वितळेल. आणि जर आसवांसह तु देवाकडे तुझ्या पापांसाठी आणि अवज्ञांसाठी क्षमा मागितलीस, तर तो तुझी पापे क्षमा करेल आणि तुला शांतता, आनंद आणि आराम देईल. “देवाचा पुत्र येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते…..जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हाला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे”(I जॉन 1:7 – 9).

येशू ख्रिस्त क्रुसावर मरण पावला फक्त आमच्या पापांसाठीच नाही, तर आमच्या आजारांसाठी सुद्धा. “त्याने आमच्या व्याधी स्वतःवर घेतल्या, त्याने आमचे रोग वाहिले” (मॅथ्यु 8:17) त्याने दुःख सहन केले. म्हणून आम्ही बरे झालो”(इसा 53:5).

मनुष्याच्या पापांमुळे, शाप आला आणि शापामुळे, त्याच्यावर आजार आला. प्रभु येशूने आमचे आजार क्रुसावर वाहिले. जर आमचा विश्वास आहे कि आम्ही त्याच्या जखमांनी बरे झालो, आम्ही आमच्या आजारातून परिपूर्ण सुटका करून घेऊन जगू शकतो.

प्रिय मित्रा! जर तू प्रभु येशूवर विश्वास करतोस ज्याने स्वतःचे आयुष्य तुझ्यासाठी दिले तो पुन्हा जिवंत झाला आहे आणि अजूनही तुझ्यासाठी जगत आहे, त्याच्या रक्ताद्वारे तुला तुझी पापे आणि आजारातून सुटका मिळू शकते. येशू ख्रिस्त तुला स्वर्गात पोहोचण्यासाठी पवित्र आयुष्य जगण्यास प्रेमाने बोलावत आहे.

जर तुमची अत्युत्तम आशीर्वाद मिळवण्याची इच्छा आहे जे प्रभु येशूच्या मृत्युद्वारे प्राप्त होतात, खालील प्रार्थना म्हणाः

“प्रभु येशू, मी विश्वास करतो कि तू तुझे आयुष्य क्रुसावर दिलेस, माझ्या पापांसाठी हौतात्म्य स्विकारलेस. कृपा करून माझी पापे क्षमा कर. मला शुद्ध कर आणि तुझ्या रक्ताद्वारे मला पवित्र कर मी तुला माझा खास स्वतःचा उद्धारक आणि देव म्हणून स्विकारत आहे. यापुढे मी तुझे मुल म्हणून जगेन. आमेन.”

 

You can find equivalent English tract @https://eevangelize.com/the-one-who-gave-his-life-for-you/