तुम्हाला शांतता मिळो
शांतता – किती मधूर आणि सुखदायी शब्द आहे हा! शांतता जी मनुष्याच्या आत्म्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो बेचैन असतो, लाखो लोक तीच्यासाठी शोधत आहेत, पण ती त्यांच्यापासून लाखो मैल दूर दिसते. धन शांतता खरेदी करू शकत नाही, शहाण्यांना ती सापडत नाही, आणि प्रसिद्धी तीला लालुच देऊ शकत नाही. शांतता तुम्ही देखील शोधत असाल, पण जास्त काही यश नसेल. किती वेळा, कारण तुमच्याकडे ही शांतता नसल्यामुळे, तुम्ही तुमच्या वैफल्याबद्दल इतरांना दोष देण्याचा प्रयत्न केला आहे, किंवा अगदी स्वतःचा जीव घेण्याचाही विचार केला आहे? तुम्हाला ड्रग्जने कदाचित शांतता मिळू शकते; परंतु ही वस्तुस्थिती सिद्ध झालेली आहे की ड्रग्जचा परिणाम एकदा का संपला, अशी शांतता हवेत अदृष्य होऊन जाते. काहीजण ट्रान्सेन्डेन्टल मेडिटेशन किंवा योगा करण्याचा प्रयत्न करतात. अलिकडेच अशा लोकांच्या जे टी.एम. अठरा महिन्यांपेक्षा जास्त काळ करत होते त्यांच्या केलेल्या मेडिकल टेस्टने प्रकट केले आहे की जे असे आचरण करत नाहीत त्यांच्यापेक्षा त्यांना दुप्पटीने मानसिक आजार आहेत. काहीजण आयुष्य एकांतात जगून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण फक्त हे दिसून येते कि अशांततेचे कारण इतरांमध्ये नाही तर त्यांच्या स्वतःमध्ये आहे. जगातून माघार घेण्याने त्यांना फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वभावातील भ्रष्टाचाराच्या समोर आणले आहे. आयुष्याचा उद्देश काय आहे, जर आम्हाला आमच्या दैनंदिन समस्यांचा सामना करण्यात शांतता आणि प्रसन्नता मिळत नसेल तर?
का आम्ही हा मार्ग तुम्हाला दाखवला त्याचे कारण आहे की आम्हाला त्या एकाचा तुम्हाला परिचय करून द्यायचा आहे, तो फक्त एक तुम्हाला खरोखरची आणि निरंतर टिकणारी शांतता देऊ शकतो. तो म्हणतो, “शांतता मी तुमच्याजवळ सोडत आहे. माझी शांतता मी तुम्हाला देतो…. तुमच्या हृदयाला शीण देऊ नका, तुम्ही त्याला घाबरवू नका”. हे फक्त रिकामे शब्द नाहीत, परंतु त्या एकाचे शब्द आहेत ज्याने स्वतःचे आयुष्य दिले हे सिद्ध करण्यासाठी कि तो तुमच्यावर प्रेम करतो, आणि तुमच्या हिताची काळजी करतो. तुम्हाला कोणीही शांतता देऊ शकणार नाही, त्याच्याशिवाय ज्याच्या स्वतःमध्ये ती आहे. तेथे फक्त एक ती शांतता असणारा आहे आणि तुम्हाला शांतता देण्याचे वचन देत आहे. त्याला शांततेचा राजकुमार म्हणून म्हटले जाते. त्याचे नांव आहे येशू.
तुम्ही कदाचित म्हणाल, “पण येशू माझ्यासाठी खराखुरा नाही आहे; मी अशा कोणाकडूनतरी कसे काही मिळवू शकतो जो मला दिसतही नाही?” जर येशू तुमच्यासाठी खरा असेल, तर तुमच्याकडे ही शांतता अगोदरच असायला हवी. तो तुमच्यासाठी खरा का नाही याचे कारण आहे, की तेथे ‘काहीतरी’ तुम्हाला त्याच्यापासून आणि त्या शांततेपासून जी तो तुम्हाला देऊ इच्छितो त्यापासून वेगळे करणारे काहीतरी आहे, ते ‘काहीतरी’ म्हणजे तुमचे स्वतःचे पाप आहे. आमच्या हृदयांत खोलवर आम्ही सर्व जाणतो कि काय बरोबर आहे आणि चूक आहे, आणि जेव्हा आम्ही आतल्या सदसदविवेकबुद्धीच्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो जो आम्हाला काही गोष्टी करू नये असे सांगतो, आम्ही खरे तर त्या एकाच्या आवाजाकडे बहीरा कान करतो जो आम्हाला त्याची शांतता देऊ इच्छितो. जरा खालील उद्धरणाबद्दल थोडा विचार कराः “जर फक्त तुम्ही माझ्या आज्ञेकडे लक्ष दिले असते, तुमची शांतता एका नदीप्रमाणे असली असती, तुमचे सदाचरण “समुद्राच्या लाटांप्रमाणे” असले असते. जर आम्ही आमची पापे कबूल करतो, आम्हाला आमच्या पापांपासून क्षमा करण्यास आणि आमच्या सर्व अन्यायकारी वागण्यापासून आम्हाला शुद्ध करण्यास परमेश्वर विश्वासू आणि न्यायी आहे”.
हे आता तुमच्यावर आहे. जर तुम्हाला खरोखरच शांतता हवी आहे, तुम्ही हे केले पाहीजे कि तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला चुकीचे म्हणून माहीत आहे त्याकडे पाठ फिरवा, आणि येशूला तुम्हाला क्षमा करण्यास सांगा. तो चांगला सक्षम आणि तुम्ही केलेली कोणतीही पापे क्षमा करण्यास इच्छुक आहे, कारण त्याने त्याचे आयुष्य तुमच्या आणि माझ्या पापांची शिक्षा भोगण्यास क्रुसावर वाहीले. तर आता देव जे काही तुमच्याकडून मागेल ते आज्ञापालन करायचा निर्णय घ्या. जर तुम्ही हे केले, तर तुम्हाला खरी शांतता मिळेल, जी तुमच्या आकलनापलिकडे असेल, तुमचे अस्तित्व भारून टाकेल, आणि ही शांतता तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. जेव्हा तुमची पापे नष्ट होतात, येशू शांततेचा राजकुमार तुमच्यासाठी खराखुरा बनेल.
शांतता, पाप आणि आजारापासून मुक्ती, सर्व एकत्र येतात. येशूने सहन केले आणि क्रुसावर मरण पावला, फक्त आपल्याला पापांपासून मुक्ती देण्यासाठीच नव्हे तर, आपल्याला आजार आणि रोगातून बरे करण्यासाठी सुद्धा. जेव्हा तुम्ही त्याला तुमचा देव आणि उद्धारक म्हणून प्राप्त करता, तो फक्त तुमच्या आत्म्यासाठी क्षमा आणि शांतताच आणत नाही तर, तुमचे शरीरही बरे करतो. राजा डेव्हीड, ज्याला हा अनुभव आला होता त्याने गायले आहे, “हे माझ्या आत्म्या, देवाची स्तुती कर, आणि त्याचे सर्व फायदे विसरू नको; जो तुझी सर्व पापे क्षमा करतो आणि तुझे आजार बरे करतो”. खात्री बाळगा, जेव्हा तुम्ही येशू, शांततेच्या राजकुमाराला भेटाल आणि त्याची शांतता मिळवाल, तुमच्या हृदयातून भीती, काळजी आणि यातना सहजपणे अदृष्य होतील. आणखी तुमच्या आयुष्यात जेथे हे जग युद्ध आणि तिरस्काराने विद्ध झालेले आहे तुम्हाला एक शांततेचा आणि प्रामाणिकपणाचा उपाय मिळेल.
प्रार्थना “प्रभु येशू, तू शांततेचा राजकुमार आहेस, आणि मला तुझी शांतता हवी आहे. मला माहीत आहे कि माझ्या पापाने मला तुझ्यापासून वेगळे केले आहे. कृपा करून माझी पापे क्षमा कर आणि माझे पापी हृदय तुझ्या मौल्यवान रक्ताने शुद्ध कर. आज, मी तुला माझा देव आणि उद्धारक म्हणून स्विकारत आहे. तू जे काही सांगशील ते करण्यास मी तयार आहे, पण कृपा करून मला मदत कर. मला बरे कर देवा आणि मला तुझी शांतता दे. आमेन.”
You can find equivalent English tract @