13 / 100

You-are-someone-special2

Download PDF Tracts

तुम्ही कोणीतरी खास आहात

एके दिवशी एका मासिकावर नजर टाकत असताना, मला हे एक चित्तवेधक वाक्य दिसले, ते असे होतेः “प्रत्येकजण कोणासाठी तरी कुणीतरी असण्यासाठी, कोणीतरी असतो”. मी थांबलो ते पुन्हा वाचले “प्रत्येकजण कोणासाठी तरी कुणीतरी असण्यासाठी, कोणीतरी असतो”. किती विचार करायला लावणारे हे वाक्य आहे!

 

या कॉम्प्युटरयुक्त जगात जेव्हा मानवी शक्तीचे स्थान शास्त्रीय शोध आणि अविष्कारांनी घेतले जात आहे, मानवाचे खरे मूल्य ओळखले गेलेले नाही. कोणीही पुरूष आणि स्त्रिया नसतात – वर्कशॉपमधला फक्त एक आकडा, जीवनाच्या मशीनमधला एक कंगोरा, मानवतेच्या महासागरातील फक्त एक थेंब. हे सत्य आहे कि असे काही जण आहेत जे त्यांच्या शारिरीक कौशल्याने, संगीतातील प्रतिभेने, खेळातील क्षमतेने आणि अशाच प्रकारे ख्याती मिळवतात, परंतु बहुतांश लोक जे आपल्याला रस्त्यावर जाताना दिसतात, ते आपल्याजवळून लक्ष न दिले जाता आणि ओळखले न जाता जात असतात.

 

नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूल, युएसए येथील डॉ. डोनाल्ड फोरमन यांच्या मतानुसार, मानवी शरीराची केमिकल घटकांनुसार किंमत फक्त $3.50 इतकीच आहे. मंदीच्या काळात, सरासरी एका शरीरातील केमिकल्सची किंमत फक्त 90 सेंट्स इतकी होती. जगाच्या दृष्टीने पाहीले तर मानव हा कोणीही नाही. कितीतरी वेळा तरूण तसेच वयस्क, या विचाराने विफलताग्रस्त झालेले असतात कि त्यांचे प्रयत्न कितीही जरी निरंतर चालू असले तरी समाजाकडून त्यांना मान्यता मिळालेली नाही, त्यांची मते स्वीकारली जात नाहीत आणि ते जगावर काहीही प्रभाव पाडत नाहीत. ते कोणीही नसतात!

 

बायबलमध्ये, येशुने एका हरवलेल्या मेंढराची बोधकथा सांगितली आहे. ही गोष्ट ल्युक चॅप्टर 15 च्या गॉस्पेलमध्ये आढळली. एक मेंढपाळ असतो ज्याच्याकडे शंभर मेंढरे असतात. पण त्यातील एक हरवते. तो नव्याण्णव मेंढरांना सोडतो आणि त्या एका मेंढराला शोधायला जातो. मार्गात अनेक धोके होते, पण त्याला ते हरवलेले मेंढरू शोधायचेच होते. अखेर शेवटी, त्याला ते सापडले. होय, त्याला ते मिळाले! त्याने त्याला खांद्यावर टाकले, घरी आणले आणि त्याच्या शेजाऱ्यांना बोलावले आणि त्यांना सांगितलेः “माझ्या आनंदात सहभागी व्हा, कारण मला माझे मेंढरू मिळाले आहे जे हरवले होते”. फक्त एक मेंढरू पण ते त्या धनगरासाठी महत्वाचे होते. येशु पुढे म्हणतोः “मी चांगला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी स्वतःचा जीव देतो” (जॉन 10:11).

 

तुम्ही त्या हरवलेल्या मेंढरासारखे असू शकता, कळप आणि घरापासून दूर भटकले गेलेले. पण एका चांगल्या मेंढपाळासाठी, तुम्ही एक अतिशय महत्वाची व्यक्ती आहात. त्याच्यासाठी तुम्ही सगळे जग एकत्र केले गेले तरी त्यापेक्षाही बहुमोल आहात, त्याच्या स्वतःच्या जीवनापेक्षा जास्त मौल्यवान. बायबल म्हणतेः “आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला” (रोमन्स 5:8). तो प्रेषित इसायाच्या तोंडूनही बोलतो किः “आई आपल्या बाळाला विसरू शकते का? नाही. आपल्या गर्भातून जन्मलेल्या मुलाला विसरू शकते का? नाही. आई आपल्या मुलाला विसरू शकत नाही आणि मी (परमेश्वर) तुला विसरू शकत नाही” (इसाया 49:15). त्याला तुमची चिंता आहे. तुम्ही आत्ता कोणत्याही स्थितीत असा, पण त्याच्या नजरेत तुमचे अफाट मूल्य आहे. तुम्ही कोणीतरी खास आहात!

 

वाचका, ही पत्रिका तू फेकून देण्यापूर्वी, ही वस्तुस्थिती विचारात घे. तुम्ही फक्त मानवांना माहीत नसलेले, समाजाकडून ओळखले जात नसलेले नाही आहात. कदाचित तुम्हाला तसे वाटत असेल – कुणाला काळजी वाटत नाही, तुम्हाला कुणी समजून घेत नाही. पण तेथे एक आहे जो काळजी घेतो आणि समजून घेतो आणि ही आमची इच्छा आहे कि तुम्हाला ह्या व्यक्तीच्या संपर्कात आणणे, जी आहे भगवान येशु ख्रिस्त. तुम्ही त्याच्यासाठी कोणीतरी आहात कोणीतरी जो वाचवला जाण्यासाठी पात्र आहे, कोणीतरी ज्याच्यासाठी जीवन देणे पात्र आहे, कोणीतरी त्याच्या नजरेत अमर्याद मौल्यवान आणि अफाट किंमतीचे आहे. येशु तुमच्यावर प्रेम करतो. तो तुम्हाला वाचवण्यासाठी मरण पावला, तो तुम्हाला क्षमा करण्यासाठी जगतो, तुम्हाला ती शांतता, आनंद आणि समाधान जे तुम्ही शोधत आहात ते तो तुम्हाला देतो. तुम्ही ख्रिस्ताचे आवडते होऊ शकता आणि त्याचे मुल बनु शकता.

तुम्ही कदाचित म्हणाल, “मी पार गेलेलो आहे, माझ्यासाठी काही आशा राहीलेली नाही, मी माझ्या वाईट सवयींचा गुलाम आहे आणि तेथे कोणीही असे नाही जे मला मदत करू शकेल”. तेथे असंख्य हजारो लोक आहेत – तरूण आणि वयस्क – ज्यांना ख्रिस्ताद्वारे नवीन आशा मिळाली आहे, नवीन जीवन, आनंद, शांतता, जीवनात एक हेतू, एक उद्दिष्ट आणि एक लक्ष्य सापडले आहे. ख्रिस्तामध्ये, त्यांना असे जीवन मिळाले आहे जे जगण्याच्या पात्रतेचे आहे. हे तुमच्यासाठी होऊ शकते जर तुम्ही तुमचे जीवन येशु ख्रिस्ताला वाहाल तर. हे तुमच्यासाठी आज होऊ शकते – आत्ता लगेच!

प्रार्थनाः “हे देवा, मी पापी आहे. मला क्षमा कर. मी स्वतःला मदत करू शकत नाही, म्हणून मी तुझ्याकडे जसा मी आहे तसा आलो आहे. मला विश्वास आहे तू माझ्यावर प्रेम करतोस आणि माझ्यासाठी मरण पत्करलेस. मला भूतकाळाकडे पाठ फिरवण्यास आणि माझ्या जीवनाच्या सर्व दिवशी तुझ्यामागे येण्यास मदत कर. माझा उद्धारक आणि भगवान म्हणून मी तुझा स्वीकार करत आहे. मी माझे सर्व जीवन तुला वाहत आहे. येशु ख्रिस्ताच्या नांवाने. आमेन.”

 

You can find equivalent English tract @

You are somone special